अन् ट्रक त्यांच्यासाठी काळ बनून आला..; कुटुंबियांना मोठा धक्का

By योगेश पांडे | Updated: October 13, 2023 16:32 IST2023-10-13T16:31:39+5:302023-10-13T16:32:43+5:30

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

And the truck became time for them..; A big shock to the family | अन् ट्रक त्यांच्यासाठी काळ बनून आला..; कुटुंबियांना मोठा धक्का

अन् ट्रक त्यांच्यासाठी काळ बनून आला..; कुटुंबियांना मोठा धक्का

नागपूर : दुचाकीवर हिंगण्याकडून नागपुरच्या दिशेने निघालेल्या एका दुचाकीस्वाराचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

मोरेश्वर कोंडबाजी गायकवाड (५६, काळमेघ नगर, एमआयडीसी) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ते नागपुरकडे निघाले होते. राजीव नगर येथील मार्गावर एचआर ५५ टी ४९३० हा ट्रक मागून वेगात आला व गायकवाड यांच्या दुचाकीला धडक दिली. ट्रक वेगात असल्याने गायकवाड खाली फेकल्या गेले व गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने एका खाजगी व त्यानंतर मेडिकल इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा मंथन याच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गायकवाड यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Web Title: And the truck became time for them..; A big shock to the family