शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
3
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
4
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
5
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
6
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
7
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
8
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
9
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
10
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
11
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
12
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
13
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
14
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
15
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
16
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
17
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
18
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
19
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
20
भारतीय रस्त्यावर धावणार १००% इथेनॉलवरील वाहने; सरकारने मांडला वाहन उत्सर्जन नियम बदल प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

..अन् नर्तिकेच्या भुताचा झाला मुंगूस

By admin | Updated: November 17, 2014 00:55 IST

मेळघाटाच्या जंगलात कोकट नावाचे वन विश्रामगृह आहे. तेथे मी नेहमीच जायचो. तिथल्या वन कर्मचाऱ्यांनी मला तेथे जाण्यापूर्वीच घाबरवून टाकले होते. रात्री २ वाजता ब्रिटिशांच्या काळातील

अरण्यवाचक मारुती चितमपल्ली यांची प्रकट मुलाखत : ‘आपली वसुंधरा’ प्रदर्शन व परिसंवाद नागपूर : मेळघाटाच्या जंगलात कोकट नावाचे वन विश्रामगृह आहे. तेथे मी नेहमीच जायचो. तिथल्या वन कर्मचाऱ्यांनी मला तेथे जाण्यापूर्वीच घाबरवून टाकले होते. रात्री २ वाजता ब्रिटिशांच्या काळातील नृत्यांगनेचे भूत येथे नृत्य करते त्यामुळे तेथे न राहणेच योग्य, असे त्यांनी सांगितले. त्या नर्तिकेच्या भीतीने येथे कुणीच येत नाही, असेही सांगण्यात आले. मला कुतूहल वाटले म्हणून मी तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. काय भानगड आहे, ती पहावी म्हणून मी थांबलो. रात्री खरेच घुंगरांचा आवाज आला. टार्च लावून ती नृत्यांगना शोधायला मी बाहेर पडलो तर गळ्यात घुंगरू बांधलेला मुंगूस उंदरांच्या मागे धावताना दिसला, अशी जंगलातील गंमत सांगत ज्येष्ठ अरण्यवाचक मारुती चितमपल्ली यांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देऊन आज अरण्यप्रेमींचे समाधान केले. स्वरसाधना आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आयोजित ‘आपली वसुंधरा’ प्रदर्शनात त्यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला. पूर्णचंद्रराव बुटी सभागृहात त्यांची मुलाखत डॉ. सुहास पुजारी आणि विवेक देशपांडे यांनी घेतली. याप्रसंगी चितमपल्ली यांनी त्यांच्या अनुभवांची शिदोरी उपस्थितांसमोर रिती करून जंगल वाचविण्याचे आवाहन केले. सातारा, सांगली परिसरात एक वनाधिकारी होते. त्यांनी त्या भागात सागवानाचे जंगल निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण हत्तींचा कळप येऊन सागाच्या झाडांची नासधूस करायचा. आदिवासी मुलीकडून त्यांना एक सूचना मिळाली. उंटावर बसून जंगलाचे रात्री रक्षण करायचे. त्यांनी तसेच केले. हत्तींनी उंट कधीच पाहिला नव्हता. त्यामुळे उंटाला पाहिल्यावर हत्तींचा कळप पळून जायचा, अशी आठवण त्यांनी सांगितली. मराठीत समुद्राच्या सृष्टीबाबत लेखनच झाले नाही. पण समुद्रात विविध प्रकारचे प्राणी आहे. खेकडे, शार्क, डॉल्फीन यांचेही वेगवेगळे प्रकार आहे. ते अभ्यासण्यासाठी मी कोकणात राहिलो. त्यावर सध्या लेखन सुरू आहे. विद्यार्थीदशेत एक शिक्षक वृक्षांची माहिती समरसून द्यायचे. खडकाळ जागेतल्या चंदनाच्या झाडाला सुगंध असतो तर सुपीक जागेतल्या चंदनाच्या झाडाला मात्र सुगंध नसतो. माणसाचेही तसेच आहे. यातना सहन केलेला माणूसच काहीतरी करू शकतो, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या आदर्शावरच मी जीवन जगलो, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)