शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

अन् मुलाचा मृतदेहच लागला हाती

By admin | Updated: December 26, 2015 03:39 IST

शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकून बंगळुरला एका केमिकल कंपनीत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्याचा ...

आईवडिल रेल्वेस्थानकावर आले होते ‘रिसिव्ह’ करायलानागपूर : शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकून बंगळुरला एका केमिकल कंपनीत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्याचा यशवंतपूर-गोरखपूर एक्स्प्रेसमधून बुटीबोरी रेल्वेस्थानकाजवळ पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दरम्यान रेल्वेस्थानकावर आपल्या मुलाला ‘रिसिव्ह’ करण्यासाठी आलेल्या आईवडिलांना आणि त्याच्या भावाला त्याच्या मृत्यूचीच वार्ता कळाल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.सौरभ विश्वजित मित्रा (२७) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो पंचरत्न अपार्टमेंट सिव्हिल लाईन्स येथील रहिवासी आहे. सौरभने लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीतून केमिकल इंजिनिअरींगची पदवी पूर्ण केली. त्यानंतर तो बंगळुरच्या एका केमिकल कंपनीत नोकरीला लागला. सुटी घेऊन तो यशवंतपूर-गोरखपूर एक्स्प्रेसने नागपूरला आईवडिलांकडे परतत होता. आपण तासभरात नागपूरला पोहोचत असल्याचे त्याने आईवडिलांना कळविल्यामुळे आईवडिल नागपूर रेल्वेस्थानकावर आपल्या दुसऱ्या मुलासह पोहोचले. यशवंतपूर गोरखपूर एक्स्प्रेस प्लॅटफार्म क्रमांक १ वर आल्यानंतर या गाडीतून त्यांचा मुलगा न उतरल्यामुळे त्यांना चिंता वाटली. लगेच त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून मिसींगची तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. परंतु लोहमार्ग पोलिसांनी त्यांना आणखी थोडा शोध घेण्यास सांगून रेल्वे सुरक्षा दलात सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा सल्ला दिला. ते रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात फुटेज पाहण्यासाठी आले. त्यांनी फुटेज दाखविण्याची विनंती केली. परंतु तेवढ्यात सकाळी ११ वाजता बुटीबोरीजवळ एक युवक रेल्वेतून पडून मृत्यू पावल्याची सूचना रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली. मृतदेह सौरभचाच आहे, याची खात्री पटल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलातर्फे त्याच्या भावाला माहिती देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच आईवडिलांना माहिती मिळताच त्यांच्या पायखालची वाळूच सरकली. ते ओक्साबोक्सी रडायला लागले. ही घटना पाहून रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात उपस्थित असलेल्या अनेकांना गहिवरून आले होते. (प्रतिनिधी)