२० हजारांत ॲप अन् कोट्यवधींचा 'खेला', एकाच प्लॅटफॉर्मवर अनेक पंटर्स सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 15:54 IST2026-04-11T15:53:14+5:302026-04-11T15:54:21+5:30
Nagpur : टी-ट्रॅटी विश्वचषकानंतर लगेच आयपीएलला सुरुवात झाल्याने बुकींनी त्यांच्या नेटवर्कच्या विस्तारावर अधिक भर दिला आहे. शहरातील अनेक कुख्यात बुकी बाहेरून ऑपरेट करत असले तरी स्थानिक पंटर्स व लहान बुकींनी थेट दुबई व युनायटेड किंगडमपर्यंत 'लिक' प्रस्थापित केली आहे.

An app worth 20 thousand and a 'game' worth crores, many punters active on the same platform
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : टी-ट्रॅटी विश्वचषकानंतर लगेच आयपीएलला सुरुवात झाल्याने बुकींनी त्यांच्या नेटवर्कच्या विस्तारावर अधिक भर दिला आहे. शहरातील अनेक कुख्यात बुकी बाहेरून ऑपरेट करत असले तरी स्थानिक पंटर्स व लहान बुकींनी थेट दुबई व युनायटेड किंगडमपर्यंत 'लिक' प्रस्थापित केली आहे. सट्टेबाजी रॅकेटमधील सूत्रधार दुबईत बसून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 'गेम' लगवाडी-खायवाडीचा संचालित करत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे आता थेट फोनपेक्षा स्थानिक बुकीदेखील स्वतःच्या वेगळ्या 'अॅप'च्या माध्यमातून 'ऑपरेट' करत आहेत.
टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवरून एका स्थानिक सट्टेबाजाने अवघ्या २० हजारांत अॅप विकत घेतले व त्यावरून कोट्यवधींची लगवाडी-खायवाडी सुरू होती. या प्रकारामुळे स्थानिक बुकींचा शोध घेतल्यावरदेखील संपूर्ण नेटवर्क थांबविणे पोलिसांसमोरील मोठे आव्हानच ठरत आहे. मनीषनगरात सट्टेबाजीच्या अड्ड्याचा भंडाफोड झाल्यानंतर त्यांची 'मोडस ऑपरेंडी' समोर आली आणि पोलिसांनादेखील धक्काच बसला. विविध टेलिग्राम ग्रुप्सवर बेटिंगशी निगडित अॅप विक्रीला उपलब्ध असतात. या अॅप्सबाबत त्यावर केवळ जाहिरात असते. जर अॅप विकत घ्यायचे असेल तर अगोदर पैसे मोजावे लागतात. त्यानंतर विशिष्ट व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये प्रवेश मिळतो. सर्वसाधारणतः २० हजारांपासून या बेटिंग अॅप्सची किंमत आहे. एकदा पैसे दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला खास व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केले जाते, जिथून संपूर्ण सट्टेबाजीचे
स्थानिक बुकी केवळ आंतरराष्ट्रीय रॅकेटचा चेहरा
सट्टेबाजीचे जाळे केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित नसून त्याची थेट आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी आहे. दुबई आणि युनायटेड किंगडमसारख्या देशांत बसलेले सूत्रधार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण सट्टेबाजी रॅकेट नियंत्रित करत आहेत. 'लगवाडी-खायवाडी'चा हा खेळ आता मोबाइलच्या एका क्लिकवर सुरू असून, स्थानिक बुकी फक्त त्याचे 'फ्रंट' म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे.
सट्टा खेळण्यासाठी 'दुबई एक्सचेंज'ची लिंक
पोलिसांच्या हाती सट्टेबाजांच्या बीपीएच सुपर' या व्हॉट्सअॅप ग्रुपचे तपशील लागले. 'जॅक स्पॅरो' नावाने या ग्रुपचा अॅडमिन असून त्यात युनायटेड किंगडम, दुबईचे क्रमांक असलेले आरोपीदेखील होते. विविध आंतरराष्ट्रीय क्रमांक वापरून आरोपी नागरिकांशी संपर्क साधतात व 'विनबझ २६. कॉम. दुबई एक्सचेंज इन' सारख्या संकेतस्थळाची लिंक व पासवर्ड पाठविला जातो. पैसे लावणाऱ्यांना भारतातीलच बँक खात्यांचे तपशील दिले जातात व त्यावरच पैसे पाठविण्याची सूचना देण्यात येते. प्रशिक्षण आणि ऑपरेशन चालते. हे अॅप मोबाइलमध्ये इंस्टॉल होताच स्थानिक बुर्कीचा 'बिझनेस' सुरू होतो.
५० हजारांची लिमिट व ३० मिनिटांचीच 'विंडो'
या रॅकेटमध्ये वापरण्यात येणारी संबंधित बैंक खाती नेहमीप्रमाणेच भाड्यावर घेतलेली असतात. मात्र, सुरक्षा व वित्तीय यंत्रणांच्या नजरेपासून वाचण्यासाठी आरोपींनी नवीन शक्कल शोधून काढली आहे. संबंधित बँक खात्यात एका वेळी ५० हजारांहून अधिक पैसे पाठवू नका तसेच एक बैंक खाते ३० मिनिटांच्या वर 'मनी ट्रान्सफर'साठी उपलब्ध राहणार नाही असा मॅसेज दुबईवरून स्थानिक पंटर्सला येतो. त्या बँक खात्याचे तपशील आले की तातडीने ते सट्टा लावणाऱ्यांना पाठविले जातात. यातून कर चुकवेगिरी करण्याचादेखील प्रयत्न असतो.