८० वर्षाच्या वृद्धाची चेन हिसकावली, तीघांना पोलिसांचा हिसका
By दयानंद पाईकराव | Updated: May 25, 2024 17:22 IST2024-05-25T17:21:39+5:302024-05-25T17:22:03+5:30
Nagpur : चेन हिसकावून पळ काढणाऱ्या तीन आरोपी २४ तासात गजाआड

An 80-year-old man's chain was seized, three were seized by the police
नागपूर : ८० वर्षाच्या वृद्धाची २ लाख ५० हजार ८३८ रुपये किमतीची चेन हिसकावून पळ काढणाऱ्या तीन आरोपींना नविन कामठी पोलिसांनी २४ तासात गजाआड करून चेन जप्त केली आहे.
करन शंकर वानखेडे (२४, रा. चित्तरंजननगर, नविन कामठी), शेख सलीम शेख शब्बीर (४४, रा. मच्छीपुल जुनी कामठी), आणि प्रकाश भागचंद टेकाम (२०, रा. कुंभार कॉलोनी, ड्रॅगन पॅलेस, नविन कामठी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुरुवारी २३ मे रोजी सायंकाळी ७.२५ वाजता नविन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनु बिअरबार मागे, सुपारेनगर, रनाळा येथे राहणारे भिरवारी तारुजी शेंडे (८०) हे आपल्या घरी टीव्ही पाहत बसले असताना त्यांच्या घराचा दरवाजा आरोपींनी ठोकला.
शेंडे यांनी दार उघडले असता दोनपेकी एका आरोपीने त्यांच्या गळ्यातील ४७ ग्रॅम सोन्याची चेन किंमत २ लाख ५० हजार ८३८ रुपये हिसकावून पळ काढला. या प्रकरणी शेंडे यांच्याकडे काम करणाºया अर्चना सिताराम गजभिये (४०, रा. जयभिम चौक, कामठी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नविन कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३९२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. तपासात पोलिसांना मिळालेली माहिती व तांत्रीक तपासाद्वारे तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांना अटक करून चोरी केलेली चेन जप्त करण्यात आली आहे.