संविधानातील पृष्ठांवर प्रकाशित जाहिरातींमुळे आंबेडकरी अनुयायी संतप्त; भदंत ससाईंनी घेतली गंभीर दखल
By आनंद डेकाटे | Updated: February 9, 2026 20:12 IST2026-02-09T20:09:51+5:302026-02-09T20:12:10+5:30
Nagpur : भारतीय संविधानातील आतिल पृष्ठांवर जाहिरात प्रकाशित करून त्या प्रतींची दीक्षाभूमीवर विक्री करणाऱ्या दोन्ही दुकानदारांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीने बाहेरचा रस्ता दाखविला.

Ambedkar's followers angry over advertisements published on pages of the Constitution; Bhadant Sasai takes serious note
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय संविधानातील आतिल पृष्ठांवर जाहिरात प्रकाशित करून त्या प्रतींची दीक्षाभूमीवर विक्री करणाऱ्या दोन्ही दुकानदारांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीने बाहेरचा रस्ता दाखविला.
भीमराज सेनेचे विदर्भ अध्यक्ष रवी नितनवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा गंभीर प्रकार रविवार ८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आणला, तसेच या प्रकरणाची लेखी तक्रार बजाज नगर पोलिस ठाण्यात केली. बजाज नगर ठाण्यातील पोलिस तात्काळ दीक्षाभूमीत पोहोचले. जाहिराती असलेल्या संविधानाच्या काही प्रती पोलिसांनी ताब्यात घेतल्या.
भंते ससाई यांनी सोमवारी दीक्षाभूमीत जाऊन समितीचे सदस्य गजघाटे यांच्याशी चर्चा केली. हा गंभीर प्रकार असल्याने दोन्ही विक्रेत्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. त्यांनी पुन्हा दीक्षाभूमी परिसरात दुकान लावू नये यासाठी भदंत ससाई बजाज नगर पोलिसांना निवेदन देणार आहेत.
यावेळी ससाईंनी दुकानातील बुद्ध आणि आंबेडकरी साहित्याची पाहणी करीत काही गालबोट तर लागले नाही, याची शहानिशा करून घेतली. या चर्चेदरम्यान अनुयायांचा रोष लक्षात घेता ससाई यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भिक्खु संघ, धम्म सेना, भीमराज सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. बजाजनगर पोलिसांचाही ताफा होता.