वाडीतील आंबेडकरनगरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST2021-03-09T04:10:13+5:302021-03-09T04:10:13+5:30

वाडी : विभाग झोन १ चे सहायक पोलीस आयुक्त कार्यालयानजीकच्या डॉ. आंबेडकरनगर परिसरात उभ्या असलेल्या कारच्या काचा एका ...

In Ambedkar Nagar of Wadi | वाडीतील आंबेडकरनगरात

वाडीतील आंबेडकरनगरात

वाडी : विभाग झोन १ चे सहायक पोलीस आयुक्त कार्यालयानजीकच्या डॉ. आंबेडकरनगर परिसरात उभ्या असलेल्या कारच्या काचा एका अज्ञात व्यक्तीने शनिवारी रात्री फोडल्याची घटना उघडकीस आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून गुन्हेगाराला अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे यांनी केली. यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्थानिक आशिष सुरेश गौरखडे (२८) यांनी कार नेहमीप्रमाणे शनिवारी रात्रीच्या सुमारास डॉ. आंबेडकरनगर वळणावर रस्त्याच्या कडेला ठेवली होती. दरम्यान, रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने भारी वस्तूने वार करून समोरील बाजूची काच फोडून नुकसान केले व पळून गेले. घटनास्थळापासून एसीपी कार्यालय हाकेच्या अंतरावर असताना आरोपीने न घाबरता ही कृती केली. रविवारी सकाळी ही बाब उघडकीस येताच कार मालकासह अन्य वाहनधारकात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Web Title: In Ambedkar Nagar of Wadi