शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांचं विमान नागपुरात येताच सिक्युरिटी अॅलर्ट वाजला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 11:24 AM

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस शनिवारी २३ जूनला नागपुरात आले. निमित्त होते, विमानाच्या सिक्युरिटी अलर्टचे!

-  नरेश डोंगरे

नागपूर : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस शनिवारी २३ जूनला नागपुरात आले. निमित्त होते, विमानाच्या सिक्युरिटी अलर्टचे! परिणामी त्यांनी येथील विमानतळावर त्यांच्या चार्टर्ड प्लेनची सिक्युरिटी चेकिंग करून घेतली अन्  इंधनही भरले. होय, जागतिक बाजारपेठेला नवा आयाम देणारे अन् कुठलीही खरेदी एका क्लिकवर आणणारे अ‍ॅमेझॉन या जगप्रसिद्ध आॅनलाईन खरेदी-विक्री संकेतस्थळाचे सीईओ जेफ बेजोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.  खास सूत्रांच्या माहितीनुसार, जेफ पत्नी आणि मुलांसह  त्यांच्या खासगी विमानाने शनिवारी, २३ जूनला सकाळी औरंगाबाद-एलोराकडे निघाले होते. त्यांच्या पायलटने त्यांना नागपूरच्या आकाशात आल्यानंतर सिक्युरिटी अलर्ट दिला.  त्यामुळे त्यांचे विमान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यासाठी परवानगी मागू लागले. एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडून ग्रीन सिग्नल मिळताच सकाळी ११ च्या सुमारास त्यांचे विमान येथील विमानतळावर उतरले. येथे त्यांनी विमानात इंधन भरले अन् विमानाची सुरक्षा तपासणी (सिक्युरिटी चेकिंग) करून घेतली. पायलट हे करवून घेत असताना जेफ यांनी विमानतळ प्रशासनाकडून आदरातिथ्याचा स्वीकार केला. खाकी रंगाचा बर्मुडा आणि पांढरे फुल्ल शर्ट अशा वेशातील जेफ यांनी शर्टाच्या बटनात काळा गॉगल अडकवला होता आणि डोक्यावर कॅपही घातली होती. विमानतळावर साधारणत: तासभराच्या मुक्कामात येथील काही कर्मचाºयांनी त्यांच्यासोबत छायाचित्र काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी कसलेही आढेवेढे न घेता, येथील महिला-पुरूष कर्मचाºयांसोबत हसतमुख पोज देत छायाचित्र काढून घेतले अन् हाय, हॅलो करीत येथून औरंगाबादला निघून गेले. जेफ बेजोस नागपुरात विमानतळावर इंधन खरेदी चार्टर्ड प्लेनचे सिक्युरिटी चेकिंगही करून घेतली.

सुरक्षेची उलटसुलट चर्चाविशेष म्हणजे, जेफ नागपुरात आल्यानंतर शहरात वेगळीच चर्चा पसरली. वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडे त्या अनुषंगाने विचारणा झाली. आंतरराष्टÑीय वलय असलेल्या व्यक्तीबाबतची अफवा झपाट्याने पसरू शकते, हे ध्यानात आल्याने वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी तातडीने शहानिशा करून घेतली. त्यानंतर जेफ नागपुरात आले होते. येथून ते औरंगाबादला गेले अन् आता (रात्री ९ च्या सुमारास) ते वाराणसी येथे असल्याचे पोलीस अधिकाºयांनी सांगितले. फोर्ब्सच्या यादीनुसार जेफ सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. ते १४१.९ अब्ज डॉलर संपत्तीचे मालक आहेत. त्यांनी अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेला नवे आयाम दिले आहे. केवळ जेफ यांच्या कल्पनेतूनच हे सर्व शक्य झाले आहे.

टॅग्स :amazonअॅमेझॉनnagpurनागपूर