अमयकुमार स्वामी ‘आरपीएफ’चे सुरक्षा आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 21:46 IST2020-05-25T21:45:19+5:302020-05-25T21:46:34+5:30

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक सुरक्षा आयुक्त अमयकुमार स्वामी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. या पुढे ते दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत.

Amay Kumar Swamy, RPF Security Commissioner | अमयकुमार स्वामी ‘आरपीएफ’चे सुरक्षा आयुक्त

अमयकुमार स्वामी ‘आरपीएफ’चे सुरक्षा आयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक सुरक्षा आयुक्त अमयकुमार स्वामी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. या पुढे ते दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्ड्येय यांची मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त पदावर नेमणूक करण्यात आली आहे. अमयकुमार स्वामी यांनी यापूर्वी जगाधरी, भुसावळ, नांदेड आणि नाशिक येथे सहायक सुरक्षा आयुक्त म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे. मुंबईतील कार्यकाळादरम्यान त्यांनी अनेक कठीण प्रसंगी कार्य केले. २००३ मध्ये झालेले बॉम्बस्फोट, नैसर्गिक आपत्तीत कामगिरी बजावली. त्यासाठी त्यांना डीजी इनसिग्निया आणि रेल्वे बोर्डातर्फे पुरस्कारही देण्यात आला होता. नागपूर विभागात विभागीय सुरक्षा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रेल्वेतील गुन्हेगारी आणि तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांचा बंंदोबस्त करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Amay Kumar Swamy, RPF Security Commissioner