शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

भाजीपाल्यासोबत डाळही सामान्यांच्याआवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 20:42 IST

पेट्रोल, डिझेल, किराणा, खाद्यतेल, किराणा आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीने महागाई गरीब व सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. भाजीपाला, धान्य आणि डाळींच्या किमतीने गृहिणींचे स्वयंपाकघराचे महिन्याचे बजेट वाढले आहे.

ठळक मुद्दे मसूर डाळीने भूक भागविली स्वयंपाकघराचे बजेट वाढले : घरखर्च चालविण्याची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : पेट्रोल, डिझेल, किराणा, खाद्यतेल, किराणा आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीने महागाई गरीब व सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. भाजीपाला, धान्य आणि डाळींच्या किमतीने गृहिणींचे स्वयंपाकघराचे महिन्याचे बजेट वाढले आहे. त्यातच पुढे सणासुदीच्या दिवसांत भाजीपाला आणि डाळींच्या किमतीत वाढ होण्याचे संकेत आहेत. वाढत्या किमतीत मसूर आणि अन्य स्वस्त डाळींनी भूक भागविली जात आहे. दरवाढीवर नियंत्रण आणण्याची ग्राहकांची मागणी आहे.

सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य आणि गृहिणी त्रस्त आहेत. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. शिवाय काहींचे उत्पन्न कमी झाल्याने घरखर्च कसा चालवायचा, याचे आव्हान उभे राहिले आहे. कोरोना महामारीने सर्व जण चिंतातुर आहेत. सध्या पावसामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक कमी झाल्याने किमती गगनाला भिडल्या आहेत. शेतकरी खरीप हंगामात गुंतल्याने भाज्यांची लागवड केली नाही. केवळ भाज्यांचे उत्पादन घेणारे शेतकरी भाज्यांची लागवड करीत आहेत. नवीन उत्पादन ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आल्यानंतरच दर कमी होतील, अशी शक्यता राम महाजन यांनी व्यक्त केली.

गेल्या महिन्यात केंद्र सरकारने डाळींच्या साठवणुकीवर मर्यादा लावल्याने भाव कमी झाले होते. पण, आता ही मर्यादा हटविल्याने सर्वच डाळींचे भाव पुन्हा क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी वाढले आहेत. सध्या उठाव नाही, पण पुढे सणांमध्ये भाव पुन्हा वाढण्याची शक्यता कळमन्यातील धान्य विक्रेते रमेश उमाठे यांनी व्यक्त केली.

डाळींचे भाव (प्रति किलो, दर्जानुसार)

तूर १०५-१२०

मूग ८०-९८

उडीद ९५-११०

मसूर ८०-९५

हरभरा ६०-७५

वाटाणा ७०-८०

...म्हणून डाळ महागली!

- चार दिवसांपूर्वी डाळींच्या साठवणुकीवरील निर्बंध केंद्र सरकारने हटविल्याने सर्व प्रकारच्या डाळींच्या किमतीत प्रति क्विंटल २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.

- तूर आणि चन्याला कमी भाव मिळाल्याने गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी कमी पेरणी केली. त्यामुळे उत्पादन कमी झाले. परिणामी, भाव वाढले.

- यंदा प्रारंभी खरीप हंगामात पावसाने दांडी मारल्याने डाळींची भाववाढ झाली.

...म्हणून भाजीपाला कडाडला!

नागपुरातील ठोक बाजारपेठांमध्ये नागपूरलगतचा परिसर आणि अन्य जिल्ह्यातून भाज्यांची आवक पावसामुळे कमी झाली आहे; शिवाय शेतातच माल खराब झाला आहे. सध्या शेतीचा हंगाम आणि मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे भाव वाढले आहेत. आणखी दीड महिना भाज्या जास्त भावात खरेदी कराव्या लागणार आहेत.

सर्वसामान्यांचे हाल 

बाजारात सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या असून महागाईने कळस गाठला आहे. महिन्याचा खर्च चालविण्याचे आव्हानच आहे. धान्य, डाळी, भाज्यांच्या किमतीत अतोनात वाढ झाली आहे. सरकारने भाववाढीवर नियंत्रण आणावे.

शाश्वती सगणे, गृहिणी.

कोरोना महामारीमुळे महिन्याचे उत्पन्न कमी झाल्याने घरखर्च चालविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. कुटुंबाचे खर्च पूर्वीपेक्षा वाढल्याने हातात पैसा उरत नाही. त्यामुळे काटकसर करावी लागते. नेहमीच्या दरवाढीने चिंतित आहे.

नीलिमा मुळे, गृहिणी.

 

भाजीपाल्याचे भाव (प्रति किलो)

कोथिंबीर १००

हिरवी मिरची ४०

फूल कोबी ५०

ढेमस ६०

टोमॅटो ४०

कारले ५०

गवार शेंग ६०

दोडके ४०

लवकी ३०

वांगे ३०

पालक ५०

टॅग्स :vegetableभाज्याInflationमहागाई