नाेकरी, पदाेन्नतीसाठी महिलांचे शाेषण होत असल्याचे आराेप ; एनएसयुआयचे विद्यापीठात आंदाेलन

By निशांत वानखेडे | Updated: March 24, 2026 20:38 IST2026-03-24T20:37:15+5:302026-03-24T20:38:13+5:30

Nagpur : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज विद्यापीठात नाेकरी व पदाेन्नतीसाठी महिलांचे शाेषण हाेत असल्याचे आराेप करीत राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एनएसयुआय) ने मंगळवारी विद्यापीठात आंदाेलन केले

Allegations that women are being exploited for jobs, promotions; NSUI protests in universities | नाेकरी, पदाेन्नतीसाठी महिलांचे शाेषण होत असल्याचे आराेप ; एनएसयुआयचे विद्यापीठात आंदाेलन

Allegations that women are being exploited for jobs, promotions; NSUI protests in universities

नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज विद्यापीठात नाेकरी व पदाेन्नतीसाठी महिलांचे शाेषण हाेत असल्याचे आराेप करीत राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एनएसयुआय) ने मंगळवारी विद्यापीठात आंदाेलन केले. विद्यापीठात अशाप्रकारे कारभार सुरू असल्याची शंका संघटनेने व्यक्त करीत नारेबाजी केली.

संघटनेने विद्यापीठात नोकरी, पदोन्नती किंवा इतर प्रशासकीय लाभांच्या नावाखाली महिलांना कोणत्याही प्रकारे लक्ष्य केले जात आहे का, याबाबत संशय निर्माण केला आहे. हा अत्यंत गंभीर विषय असून याची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी होणे आवश्यक आहे. विद्यार्थी हित आणि संस्थेची प्रतिष्ठा लक्षात घेऊन या विषयावर विद्यार्थी आणि एनएसयूआय प्रतिनिधींनी कुलगुरूंशी भेट घेऊन या संवेदनशील विषयाची माहिती गोपनीयपणे देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना कुलगुरूंची भेट मिळू शकली नाही. यावेळी कुलगुरू अनुपस्थित असल्याने पदाधिकाऱ्यांनी कुलसचिवांना निवेदन दिले. या प्रसंगी अजीत सिंह, आशीष मंडपे, वैष्णवी भारद्वाज, प्रणय सिंह ठाकूर, विद्यासागर त्रिपाठी, लोकेश फुलजले, दयाशंकर शाहू, जैनुएल ओवेस, रॉयल गेंडाम, बृजेश हाडके, शियाल नवनागे, शशांक यावले आदी प्रमुख उपस्थित होते.

कुठलीही लेखी तक्रार, पुरावे न देता आराेप करणे याेग्य नाही : कुलगुरू

यासंदर्भात विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी सांगितले की, जर कोणतीही अनियमितता किंवा शोषणाचा प्रकार असेल, तर संघटनेने तो स्पष्टपणे मांडावा. एनएसयूआयचे पदाधिकारी जेव्हा विद्यापीठात आले, त्या वेळी मी परीक्षा विभागात होते. सध्या विद्यापीठाची पहिली प्राथमिकता म्हणजे निकाल वेळेत जाहीर करणे आहे आणि सर्वांचे लक्ष त्यावरच केंद्रित आहे. संघटनेने आपली तक्रार लेखी स्वरूपात द्यावी, आराेपाबाबतचे पुरावे द्यावे किंवा संबंधित अधिकाऱ्यांना कळवाव्यात, त्यांचे निराकरण केले जाईल.

Web Title : विश्वविद्यालय में नौकरी के लिए महिलाओं के शोषण के आरोप, एनएसयूआई का प्रदर्शन

Web Summary : एनएसयूआई ने नागपुर विश्वविद्यालय में नौकरी और पदोन्नति के लिए महिलाओं के शोषण का आरोप लगाते हुए विरोध प्रदर्शन किया। उन्होंने पारदर्शी जांच की मांग की। विश्वविद्यालय ने सबूत के साथ लिखित शिकायत का आग्रह किया।

Web Title : NSUI Protests Alleged Exploitation of Women for Jobs at University

Web Summary : NSUI protested at Nagpur University, alleging exploitation of women for jobs and promotions. They demanded a transparent inquiry. The university urged a written complaint with evidence.