लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत काही ठिकाणी महायुती एकत्रित असून बऱ्याच ठिकाणी मित्रपक्षांविरोधातच भाजपचे उमेदवार लढत आहेत. काही ठिकाणी बंडखोरीदेखील झाली आहे. मात्र सर्व बंडखोर अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत आपले अर्ज मागे घेतील असा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे नागपुरात ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
विदर्भातील अनेक ठिकाणी महायुतीची युती झाली आहे. काही ठिकाणी महायुती म्हणून तर काही ठिकाणी मित्रपक्ष म्हणून आम्ही लढत आहोत. ज्या ठिकाणी मित्रपक्षाविरुद्ध लढत आहोत, तिथेही मनभेद निर्माण होऊ देणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. योजनांचा लाभ सर्व समाजापर्यंत पोहोचवायचा असेल, तर महायुतीचा नगराध्यक्ष निवडून येणे गरजेचे आहे. नगरपालिकांचा विकास करण्याची क्षमता भाजप आणि महायुतीकडेच आहे, असे बावनकुळे म्हणाले.
कामठी नगरपरिषदेसह राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये महायुती एकसंधपणे आणि ताकदीने मैदानात उतरली आहे. जनता विकासाला मत देणार आहे व यावेळी धर्मपंथापलीकडे जाऊन मतदान होईल. महायुतीला किमान ५१ टक्के मते मिळणार असल्याने आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बिहारचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसेल
राज्यातील निर्णयप्रक्रियेवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, ज्या पदाला ज्या व्यक्तीची गरज असते, त्या वेळेस महाराष्ट्र निर्णय घेतो. सरकार कोणतेही असो. काही विषय भावनिक असतात, त्यावरच निर्णय घेतले जातात. बिहारचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसेल, असे ते म्हणाले.
Web Summary : Minister Bawankule claims all rebels will withdraw nominations before the deadline. Mahayuti fights together in some places, against allies elsewhere. BJP aims for development across communities, expects 51% vote share. He also hinted at Bihar's influence on Maharashtra's decisions.
Web Summary : मंत्री बावनकुले का दावा है कि सभी बागी समय सीमा से पहले नामांकन वापस ले लेंगे। महायुति कुछ जगहों पर एक साथ लड़ती है, तो कहीं सहयोगियों के खिलाफ। बीजेपी का लक्ष्य सभी समुदायों का विकास है, 51% वोट शेयर की उम्मीद है। उन्होंने महाराष्ट्र के निर्णयों पर बिहार के प्रभाव का भी संकेत दिया।