नागपूरचे चारही न्यायमूर्ती सुपुत्र न्यायदानासाठी सज्ज; औरंगाबाद आणि नागपूरमध्ये रुजू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 18:06 IST2025-09-04T18:01:41+5:302025-09-04T18:06:46+5:30
मंगळवारी घेतली शपथ : न्या. पठाण औरंगाबाद तर, न्या. देशपांडे, न्या. व्यास, न्या. वाकोडे नागपूरमध्ये रुजू

All four judges of Nagpur are ready to administer justice; Join Aurangabad and Nagpur
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईउच्च न्यायालयाचे नवीन अतिरिक्त न्यायमूर्ती मेहरोज अश्रफ खान पठाण यांना औरंगाबाद तर, न्यायमूर्ती नंदेश शंकरराव देशपांडे, न्यायमूर्ती रजनीश रत्नाकर व्यास व न्यायमूर्ती राज दामोदर वाकोडे यांना नागपूर खंडपीठामध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. हे चारही न्यायमूर्ती नागपूरचे सुपुत्र आहेत.
या न्यायमूर्तीचा शपथविधी समारंभमंगळवारी (ता. २) मुंबई येथे पार पडला. त्यानंतर त्यांनी बुधवारपासून न्यायदानाला सुरुवात केली. केंद्र सरकारने गेल्या २७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची शिफारस मंजूर करून या चौघांसह एकूण १४ वकिलांची अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती केली आहे. इतर नवीन न्यायमूर्तिमध्ये संदेश पाटील, श्रीराम सिरसाट, रणजीतसिंह राजा भोसले, आशिष चव्हाण, फरहान दुबाश, आबासाहेब शिंदे, हितेन वेणेगावकर, अमित जामसांदेकर, वैशाली पाटील-जाधव व सिद्धेश्वर ठोंबरे यांचा समावेश आहे.
न्यायमूर्तीची एकूण संख्या झाली ८२
- नवीन नियुक्त्यांमुळे मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीची संख्या वाढून ८२ झाली आहे.
- या न्यायालयाला न्यायमूर्तीची ९४ पदे मंजूर आहेत. न्यायमूर्तीची संख्या वाढल्यामुळे न्यायदान प्रक्रियेला गती मिळणार आहे.