शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

आकाश ठाकूर अडकला

By admin | Updated: May 19, 2015 01:57 IST

जेल ब्रेक मधील तिसरा आरोपी आकाश ऊर्फ गोलू रज्जूसिंग ठाकूर याच्या मुसक्या बांधण्यात गुन्हेशाखेच्या पथकाने

पांढुर्ण्यात बांधल्या मुसक्या : गुन्हेशाखेची कामगिरीनागपूर : जेल ब्रेक मधील तिसरा आरोपी आकाश ऊर्फ गोलू रज्जूसिंग ठाकूर याच्या मुसक्या बांधण्यात गुन्हेशाखेच्या पथकाने सोमवारी यश मिळवले. तो पांढुर्ण्यात (मध्यप्रदेश) दडून होता. आरोपी आकाशला पकडण्यातसोबतच चार दिवसात गुन्हेशाखेच्या पथकाने दुसऱ्यांदा यश मिळवले.३१ मार्चच्या पहाटे मध्यवर्ती कारागृहातून शिबू ऊर्फ मोहम्मद शोएब सलीम खान, प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री, सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता, बिशनसिंग रम्मूलाल उके आणि गोलू ऊर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर हे पाच खतरनाक कैदी पळून गेले होते. या घटनेमुळे कारागृह प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचीही नाचक्की झाली होती. त्यांना पकडण्यासाठी गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे पथक रात्रंदिवस प्रयत्नरत होते. अखेर १४ मे रोजी त्यांना यश मिळाले. सोहेल खान ऊर्फ शिबु सलिम खान आणि प्रेम ऊर्फ नेपाळी शालिकराम खत्री या दोघांसोबच त्यांचा साथीदार अरमान मुन्ना याच्याही पोलिसांनी मुसक्या बांधल्या. ते सध्या गुन्हेशाखेच्या कस्टडीत आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तिसरा कैदी आकाश ठाकुर हा पांढुर्णा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून उपायुक्त दीपाली मासिरकर सहायक आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ढोले, ताथोड, एपीआय मंगेश देसाईआणि त्यांचे सहकारी सकाळी पांढुर्ण्यात पोहचेले.शहरातील विविध झोपडपट्ट्यांमध्ये शोधमोहिम राबविण्यात आली. दुपारी १ च्या सुमारास आकाश बसस्थानकाजवळ संशयास्पद अवस्थेत आढळला. साध्या वेशातील पोलिसांनी घेरल्याचे लक्षात येताच त्याने पळण्याचा प्रयत्न केला़ झटापटही केली. मात्र, पोलिसांनी त्याला जेरबंद केले.गर्दी अन् गडबडदिवसाढवळ्या एका तरुणाला अनेकांनी पकडल्याचे आणि तो तरुण आरडाओरड करीत असल्याचे पाहून घटनास्थळी मोठी गर्दी जमली. गडबड झाल्यामुळे पोलीसही आले. गुन्हेशाखेच्या पथकाने पांढुर्णा पोलिसांना आरोपी आकाशबाबत माहिती दिली. तेथील ठाण्यात नोंदही केली आणि त्याला नागपुरात आणले. आकाशविरुद्ध वाहनचोरीचे १४ तर, लुटमारीचा एक गुन्हा आहे.