शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फार्म हाउसवरील धाड हे कुंभारे यांचे षड्यंत्र ? बावनकुळे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे अजय अग्रवाल यांचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:41 IST

Nagpur : भाजपचे कामठीत मजबूत पक्षसंघटन आहे. त्यामुळे भाजपने येथे स्वबळावर निवडणूक लढविली. यात आमचा विजयही होईल असा विश्वास अग्रवाल यांच्यासह भाजपचे जिल्हा महामंत्री अनिल निधान यांनी पत्रपरिषदेत दरम्यान केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी-नागपूर मार्गावर असलेल्या सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाउसवर मंगळवारी निवडणूक विभाग व पोलिसांनी टाकलेली धाड ही बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नेत्या अॅड. सुलेखा कुंभारे यांनी रचलेले षड्यंत्र आहे. सुनील अग्रवालचा भाजपशी कोणताही संबंध नाही. कुंभारे यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बदनामी करण्यासाठी काँग्रेससोबत मिळून हा प्रकार घडवून आणल्याचा गंभीर आरोप भाजपचे कामठीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय अग्रवाल यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केला आहे.

मंगळवारी कामठी नगर परिषद निवडणुकीदरम्यान नागपूर-कामठी मार्गावरील उद्योजक सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाउसवर धाड टाकत पोलिस व निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने दारूच्या बाटल्या ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल, बोटावरील शाई मिटविण्याचे लिक्विड (द्रव) यासह ९ पुरुष आणि ३ महिलांना ताब्यात घेतले होते. निवडणूक विभागाने जप्त केलेले साहित्य व ताब्यात घेतलेल्या लोकांशी भाजपचा काही एक संबंध नाही. हे कुंभारे आणि काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शकूर नागाणी यांनी घडवून आणले आहे. त्यांनीच तिथे लोक आणि उपरोक्त साहित्य आणल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला.

भाजपचे कामठीत मजबूत पक्षसंघटन आहे. त्यामुळे भाजपने येथे स्वबळावर निवडणूक लढविली. यात आमचा विजयही होईल असा विश्वास अग्रवाल यांच्यासह भाजपचे जिल्हा महामंत्री अनिल निधान यांनी पत्रपरिषदेत दरम्यान केला.

युती केली नाही म्हणून

कालपरवापर्यंत बावनकुळे यांच्या विकासकामांचा पाढा वाचणाऱ्या कुंभारे यांच्या उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी भाजपने संधी दिली नाही. यासोबतच आम्ही नगर परिषदेत 'बरिएमं'सोबत युती केली नसल्याने कुंभारे भाजप आणि बावनकुळे यांच्यावर चुकीचे आरोप लावत आहेत. भाजपने त्यांना युतीचा प्रस्तावही दिला होता. तो त्यांनी स्वीकारला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmhouse Raid: Kumbhare's Conspiracy to Defame Bawankule, Alleges Ajay Agarwal

Web Summary : Ajay Agarwal alleges the farmhouse raid was a conspiracy by Sulekha Kumbhare and Congress to defame Minister Bawankule. Agarwal denies BJP's connection to seized items and those detained, accusing Kumbhare and Nagani of planting evidence due to failed alliance talks.
टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकNagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणुक 2022nagpurनागपूर