Airport security Personal Refusal for the flight of armed Police | सशस्त्र जवानांच्या विमानवारीला सुरक्षा यंत्रणेचा नकार

सशस्त्र जवानांच्या विमानवारीला सुरक्षा यंत्रणेचा नकार

नागपूर : गो एअरवेजच्या विमानाने नागपूरहून दिल्लीला जाऊ पाहणा-या हरियाणा पोलीस दलाच्या सशस्त्र जवानांना आज  विमानतळावरून परतवण्यात आले. या संबंधाने रात्रीपर्यंत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. 
वरिष्ठ अधिका-यांनी मध्यरात्री या वृत्ताच्या संबंधाने खुलासा केला. त्यानुसार, आज सायंकाळी हरियाणा सुरक्षा दलाचे जवान सर्व्हीस रिव्हॉल्वरसह नागपूर विमानतळावर आले. त्यांना येथून विमानाने दिल्लीला जायचे होते. मात्र, शस्त्रे घेऊन जाण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे विमानतळावरील सुरक्षा अधिका-यांनी त्यांना विमानतळाच्या परिसरातच रोखले. तेथून त्यांना विमान प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आली. या संबंधाने मध्यरात्रीपर्यंत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

Web Title: Airport security Personal Refusal for the flight of armed Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.