शहरं
Join us  
Trending Stories
1
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
2
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
3
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
4
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?
5
सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले
6
जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड
7
निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
8
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
9
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
10
अरे बापरे! तुम्हीही प्लास्टिकचा कोबी खाताय? धक्कादायक Video पाहून व्हाल हैराण
11
दुर्गापूरमध्ये मित्रानेच एमबीबीएस विद्यार्थिनीवर लैगिक अत्याचार केले? पोलिसांनी केली अटक
12
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
13
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
14
बॉलिवूडवर शोककळा! पंकज धीर यांच्यानंतर दिग्गज अभिनेत्री मधुमती यांचं निधन, ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
16
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
17
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
18
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
19
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी

रोमिओच्या पाठलाग व धमक्यांमुळे एअरलाइन्सच्या केबिन क्रू तरुणीचे करिअर संपलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 18:50 IST

फेसबुक ओळख ठरली जीवघेणी : प्रेमात नकार दिला म्हणून सुरु झाला छळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विवाहित असूनदेखील एका रोमिओने एकतर्फी प्रेमातून एअर लाइन्समध्ये काम करणाऱ्या तरुणीचा पाठलाग करून सातत्याने धमक्या दिल्या. त्याच्या दहशतीमुळे अखेर तरुणीने नोकरीवर पाणी सोडले. पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

वीरसिंग अमरसिंग वर्मा (धम्मदीपनगर) असे आरोपीचे नाव आहे. संबंधित तरुणी मागील काही वर्षापासून देशातील नामांकित एअरलाइन्समध्ये केबिन क्रू म्हणून कार्यरत होती. घराजवळील एका तरुणाचा नातेवाईक असलेल्या वीरसिंगसोबत तरुणीची २०१९ साली ओळख झाली होती. वीरसिंगने तिला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती व संबंधित तरुणाच्या सांगण्यावरून तिने ती स्वीकारली. त्यानंतर त्यांचे बोलणे सुरू झाले. २०२१ साली वीरसिंगचे लग्न झाले. मात्र, लग्न झाले असूनदेखील तो सातत्याने तरुणीवर बोलण्याचा दबाव आणायचा व तिला भेटण्यासाठी जबरदस्ती करत होता. जर बोलली नाहीस तर तिच्या होणाऱ्या पती तसेच घरच्यांना प्रेमप्रकरण असल्याचे खोटे सांगण्याची तो धमकी देत होता. ऑगस्ट २०२४ मध्ये त्याने तिच्यावर प्रेमसंबंध बनविण्याचा दबाव आणला. सप्टेंबर २०२४ मध्ये तरुणी कामानिमित्त तेलंगणामध्ये राहायला गेली. तेथेदेखील आरोपी वीरसिंग तिच्या पाठोपाठ पोहोचला. तिथेदेखील तो तिला धमकी देऊन भेटण्यासाठी जबरदस्ती करत होता.

या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने महिन्याभरापूर्वी नागपूर गाठले व तणावातून दोन आठवड्यांअगोदर नोकरीचा राजीनामा दिला. सहनशक्ती संपल्याने तिने तिच्या कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी त्याच्याशी बोलण्यासाठी त्याचे घर गाठले, मात्र तो घरी नव्हता. काही वेळाने त्याने तरुणीला फोन करून तिच्यासह तिच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली. अखेर तरुणीने कळमना पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी वीरसिंगविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मी बजरंग दलाचा कार्यकर्ता, तुझ्यासोबत काहीही करू शकतोतरुणीला शिवीगाळ करत असताना वीरसिंगने तुम्ही माझे काहीच बिघडवू शकत नाही. माझी ओळख वरपर्यंत आहे. मी बजरंग दलाचा कार्यकर्ता असून तुझ्यासोबत काहीही करू शकतो. पोलिस पण माझे काही बिघडवू शकत नाही, असे म्हणत तिला व कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. एका रोमिओच्या त्रासाला कंटाळून हरहुन्नरी तरुणीला तिच्या करिअरवर पाणी सोडावे लागणे ही संतापजनक बाब आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर