शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमधील विमान निर्मिती, देखभाल दुरुस्तीलाही 'बूस्ट'; 'एमआरओ'चा व्यवसायात पडणार मोठी भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 20:26 IST

Nagpur : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये विमान क्षेत्रासाठी प्लास्टिक, कंपोझिट मटेरियल व अॅल्युमिनियम अलॉय, टेपिंग आदींच्या करात सवलत देण्यात आल्याने नागपुरात विमाने तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये विमान क्षेत्रासाठी प्लास्टिक, कंपोझिट मटेरियल व अॅल्युमिनियम अलॉय, टेपिंग आदींच्या करात सवलत देण्यात आल्याने नागपुरात विमाने तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जाणकरांच्या मते, ही मोठी सूट असून विमानांचे स्पेअरपार्ट तयार करणारे व त्यांची देखभाल दुरुस्ती करणारे युनिट आता विमाने तयार करण्यासाठी संशोधन व विकासाचे काम करू शकणार आहेत. यामुळे 'मेक इन इंडिया'ला प्रोत्साहन मिळून नागपुरातील सर्वात मोठ्या दोन 'एमआरओ'ला फायदा होणार आहे. त्यासोबतच राफेल हे लढाऊ विमान तयार करणारी कंपनीही यामुळे सक्रिय होणार आहे.

आतापर्यंत विमानांसाठी प्लास्टिक व कंपोझिट मटेरियलवर ३५ टक्के कर आणि अॅल्युमिनियम अलॉय, टेपिंग आदींसाठी ७.५ टक्के कस्टम ड्युटी आकारण्यात येत होती. मागील आणि या वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या विमान अपघातानंतर हा एक मोठा पुढाकार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे देशातील विमान क्षेत्राला नव्या पद्धतीने 'टेक ऑफ' करण्याची संधी मिळाली आहे. मिहान-सेझ क्षेत्रात विजेसह विविध सवलती मिळत आहेत. दरम्यान, कच्च्या मालावर लागणाऱ्या करात सूट मिळाल्याने नवे मॉडेल व नव्या तंत्रज्ञानाची विमाने तयार करण्यासाठी संशोधन करणे सुलभ झाले आहे. नागपुरात एक एआयईएसएलचे एमआरओ तसेच इंडामेट एव्हिएशन टेक्निक्स प्रा. लि.चे एमआरओ आहे. याशिवाय डीआरएएलचे एक युनिटही आहे. येथे राफेल लढाऊ विमाने तयार केली जात आहेत. संरक्षण क्षेत्रासाठी अशा उपाययोजनांद्वारे संरक्षण युनिट्सद्वारे देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉलसह इतर गरजांसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांच्या सुट्या भागांच्या निर्मितीसाठी कच्च्या मालावर कस्टम ड्यूटीत सवलत मिळाल्यास उत्पादन प्रक्रियेला गती मिळणार आहे.

हे आहेत महत्त्वाचे मुद्दे

  • मिहान-सेझमधील एव्हिएशन हबसाठी आरक्षित ३०० एकर जमिनीत नव्या कंपन्या होणार दाखल
  • नागपूर विमानतळाच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा
  • विदर्भाला मिळू शकतात 'आरसीएस' विमाने
  • मिहान-सेझमध्ये हेलिकॉप्टर निर्मितीसाठी पोषक वातावरण
English
हिंदी सारांश
Web Title : Mihan Aviation: Manufacturing, Maintenance to Get Boost; MRO Business to Flourish

Web Summary : Tax breaks on aircraft materials will boost Nagpur's aviation manufacturing and maintenance. This favors 'Make in India' and benefits MROs, potentially activating Rafale fighter jet production. The move aims to revitalize the aviation sector with new technology and research in Mihan-SEZ.
टॅग्स :Budgetअर्थसंकल्प २०२६nagpurनागपूर