शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांची संकल्पपूर्ती हाच भिक्खू संघाचा उद्देश

By admin | Updated: September 14, 2014 01:06 IST

मानव जातीच्या विकासासाठी बुद्ध धम्माची गरज असून ‘संपूर्ण भारत मी बुद्धमय करेन’ असा संकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. बाबासाहेबांची ही संकल्पपूर्तीच भिक्खू संघाचा मुख्य उद्देश आहे,

राष्ट्रीय शिखर बौद्धधम्म परिषद : संघानुशासक सदानंद महास्थवीर नागपूर : मानव जातीच्या विकासासाठी बुद्ध धम्माची गरज असून ‘संपूर्ण भारत मी बुद्धमय करेन’ असा संकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. बाबासाहेबांची ही संकल्पपूर्तीच भिक्खू संघाचा मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन संघानुशासक सत्धम्मादित्य सदानंद महास्थवीर यांनी आज येथे धम्मदेसना देताना केले. भारतातील बौद्धांच्या संवैधानिक हक्कांच्या व सवलतींच्या प्रश्नांवर देशव्यापी चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने समता सैनिक दलातर्फे रामगोपाल माहेश्वरी हॉल हिंदी मोरभवन सीताबर्डी येथे दोन दिवसीय ‘राष्ट्रीय शिखर बौद्धधम्म परिषदेला शनिवारपासून सुरुवात झाली. संघानुशासक सत्धम्मादित्य सदानंद महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली भिक्खू संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी धम्मदेसना दिली. ‘संपूर्ण भारत मी बुद्धमय करीन’हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पूर्ण करण्यास भिक्खू संघाची भूमिका’ या विषयावर चर्चा करताना सदानंद महास्थवीर यांनी देशातील बुद्ध धम्माच्या एकूणच परिस्थितीवर लक्ष वेधले. महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी अनागारिक धम्मपाल यांनी दिलेल्या लढ्याची माहिती दिली. यावेळी भिक्खू डॉ. खेमधम्मो महास्थवीर, भिक्खू डॉ. एन. बोधिरत्न महास्थवीर, भिक्खू चंद्रकिर्ती, भिक्खू आचार्य श्रद्धाशील, भिक्खू नंदवर्धन बोधी यांनीही मार्गदर्शन केले. भिक्खू कृपाशरण महास्थवीर यांनी संचालन केले. यानंतर ‘धम्म प्रचाराच्या कार्यात भिक्खू संघाला येणाऱ्या अडचणी व त्यांचे निवारण’ या विषयावर भिक्खू सत्यशील महास्थवीर, भिक्खू ज्ञानबोधी महास्थवीर, भिक्खू महापंथ महास्थवीर, भिक्खू डॉ. भदंत ज्ञानदीप महास्थवीर, भिक्खू डॉ. भदंत चिंचाळ मेतानंद, भिक्खू रुपम यांनी मार्गदर्शन केले. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या भिक्खू संमेलनामध्ये शनिवारी एकूण १५ ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेले महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा, बौद्ध धम्मासोबत शासनाने भेदभाव बंद करावा, सन्मानाची वागणूक द्यावी, प्रत्येक राज्यात बौद्ध विद्यापीठ स्थापन करावे, विनयपिटक हाच भिक्खंूचा मार्गदर्शक ग्रंथ असून विनयाचे पालन करावे, भिक्खुंसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावी आदी ठरावांचा समावेश होता. (प्रतिनिधी)