शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रक्षिकाची ‘एम्स’ भरारी

By admin | Updated: June 27, 2014 00:41 IST

नवी दिल्ली येथील ‘एम्स’च्या (आॅल इंडिया इस्टिट्युट आॅफ मेडिकल सायन्सेस)वतीने गेल्या १ जून रोजी घेण्यात आलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेमध्ये नागपूरच्या रक्षिका तेलतुंबडे हिने बाजी

उपराजधानीचे नाव उंचावले : ‘एम्स’च्या खडतर परीक्षेत उत्तीर्ण नागपूर : नवी दिल्ली येथील ‘एम्स’च्या (आॅल इंडिया इस्टिट्युट आॅफ मेडिकल सायन्सेस)वतीने गेल्या १ जून रोजी घेण्यात आलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेमध्ये नागपूरच्या रक्षिका तेलतुंबडे हिने बाजी मारली आहे. ‘एम्स’ची परीक्षा ही अतिशय कठीण समजली जाते. त्यामुळे मागील काही वर्षांचा विचार केला असता नागपूरच नव्हे तर विदर्भातून ही परीक्षा उत्तीर्ण करणारी रक्षिका ही पहिली मुलगी असण्याची शक्यता आहे. तिच्या या यशाने नागपूरची मान उंचावली आहे.संपूर्ण देशात ६७२ जागांसाठी देशभरातून लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यात नागपूरच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या रक्षिकाने बाजी मारली. रक्षिकाने एम.एच.सी.ई.टी., ए.आय.पी.एम.टी., तसेच सेवाग्राम वर्धा या परीक्षासुद्धा उत्तीर्ण केल्या आहेत. सध्या तिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. रक्षिका ही दहावीच्या परीक्षेत नागपुरातून तिसरी तर मागासवर्गीयांमधून पहिली आली होती. बारावीच्या परीक्षेत तिने ९० टक्के गुण प्राप्त केले होते. रक्षिकेचे वडील रवींद्र आणि आई प्रतिभा हे दोघेही बँकेत आहेत. मोठी बहीण रुचिका ही इंजिनियर आहे. (प्रतिनिधी)‘बेसिक’ समजून घेणे महत्त्वाचेएक प्रसिद्ध डॉक्टर होऊन लोकांची सेवा करण्याचे रक्षिकाचे स्वप्न होते. ते स्वप्न ‘एम्स’च्या प्रवेशातून पूर्ण होणार आहे. ‘एम्स’ प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी तिने अकराव्या वर्गापासूनच सुरू केली होती. परंतु यासाठी तिने घेतलेली मेहनतही महत्त्वाची आहे. ‘एम्स’च्या परीक्षेतच जनरल नॉलेजलाही अधिक महत्त्व असल्याने दररोज ६ ते ८ तास अभ्यास करण्याबरोबरच दैनंदिन घडामोडीवरही तिचे बारीक लक्ष राहायचे. कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करताना विषयातील ‘बेसिक’ समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना रक्षिकाचे सांगणे आहे.