एआय की केमिकल? इंजिनीअरिंगची शाखा निवडीचा 'स्मार्ट' मंत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:14 IST2025-07-21T13:13:44+5:302025-07-21T13:14:56+5:30
कटऑफपेक्षा 'कुतूहल' महत्त्वाचं! : इंजिनीअरिंग शाखा निवडताना काय लक्षात घ्याल?

AI or Chemical? The 'smart' mantra for choosing an engineering branch!
डॉ. श्रीराम सोनवणे, व्हीएनआयटी
नागपूर : भारतभरात अभियांत्रिकीच्या पदवीपूर्व प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहेत. विद्यार्थी आणि पालक, कोणती शाखा घ्यावी, या महत्त्वाच्या प्रश्नाशी सामना करत आहेत. आयआयटी, एन-आयटी आणि नामांकित खासगी महाविद्याल-यांमध्ये प्रवेशासाठी लाखो विद्यार्थ्यांमध्ये चुरस आहे. त्यातच एआय, डाटा सायन्स, मशिन लर्निंग या संगणकीय शाखेतील तंत्रज्ञानाने अभियांत्रिकी शिक्षणाचा ट्रेंडच बदलला आहे. मात्र इंजिनीअ रिंगच्या प्रत्येक शाखेत, किंबहुना प्रत्येक क्षेत्रात एआय, डाटा सायन्सचा अंतर्भाव अगत्याचा झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ट्रेंडचा पाठलाग कर-ण्यापेक्षा आपली आवड, क्षमता आणि भविष्यातील बदल याचा समतोल साधून शाखा निवडावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
कटऑफपेक्षा कुतूहल महत्त्वाचे
अनेक विद्यार्थी फक्त उच्च पगाराच्या संधी पाहून शाखेची निवड करतात, पण स्वतःची आवड, कल आणि दीर्घकालीन करिअर ध्येय दुर्लक्षित करतात. शाखा ही नुसती नोकरी मिळवण्याचे साधन नसून, तुम्हाला कसा अभियंता व्हायचे आहे, हे ठरवणारी संधी आहे. पालकांनी परंपरागत निवडी लादण्यापेक्षा मुलांमध्ये आत्मशोधाला प्रोत्साहन दिले पाहिजे.
निर्णय घेण्यापूर्वी विचारात घ्याव्यात अशा गोष्टी
- स्वतःला ओळखाः तुम्हाला प्रयोगशाळा आवडते की कोडिंग? डेटा की उपकरणं
- संस्थेचा अभ्यास कराः प्राध्यापक, प्रयोगशाळा, इंटर्नशिप आणि प्लेसमेंट तपासा.
- ज्येष्ठ विद्यार्थ्यांशी बोलाः सल्ला घ्या आणि प्रत्यक्ष अनुभव समजून घ्या.
- कोर इंजिनीअरिंगकडे दुर्लक्ष करू नकाः केमिकल, सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रानिक्स या मूल शाखांमध्ये आता एआय, आयओटी, डेटा अॅनालिटिक्सचा समावेश होत आहे.
- कोणतीही शाखा ही कमी लेखण्यासारखी नाही, समर्पित अभ्यास महत्त्वाचा.
तंत्रज्ञान झपाट्याने बदलते,
एआय, सायबरसिक्युरिटी, डेटा सायन्स यांसारख्या नवीन शाखा आकर्षक असल्या तरी त्या गंभीर संगणकीय अभ्यासाची गरज असलेल्या आहेत आणि त्यांच्या व्याप्तीमध्ये झपाट्याने बदल होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोर्सची खोली आणि भविष्यातील गरजांवर विचार करून निर्णय घ्यावा.
केमिकल इंजिनीअरिंग : बहुपर्यायी आणि भविष्यकालीन शाखा
- केमिकल इंजिनीअरिंग ही आजच्या घडीला सर्वात बहुउपयोगी आणि लवचिक शाखांपैकी एक आहे. ही शाखा रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, आणि जीवशास्त्र यांचा समन्वय साधणारी शाखा आहे.
- पेट्रोकेमिकल्स आणि ऊर्जा औषधनिर्माण आणि जैवतंत्रज्ञान अन्न प्रक्रिया आणि पर्यावरण तंत्रज्ञान नॅनोतंत्रज्ञान आणि प्रगत साहित्ये
- अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनीअरिंगच्या अहवालानुसार, केमिकल इंजिनीअर्स हे हरित हायड्रोजन, कार्बन कॅप्चर, कचऱ्यातून ऊर्जा आणि प्रक्रिया सुधारणा यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.