विनयभंगाची तक्रार केल्याने संतप्त आरोपीकडून तरुणीचा परत विनयभंग

By योगेश पांडे | Updated: August 14, 2023 16:32 IST2023-08-14T16:31:42+5:302023-08-14T16:32:14+5:30

अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

After complaining of molestation, the girl was molested again by the angry accused | विनयभंगाची तक्रार केल्याने संतप्त आरोपीकडून तरुणीचा परत विनयभंग

विनयभंगाची तक्रार केल्याने संतप्त आरोपीकडून तरुणीचा परत विनयभंग

नागपूर :विनयभंगाची तक्रार केल्याने संतप्त झालेल्या आरोपीने संधी साधत एका तरुणीचा परत विनयभंग केला. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

सनी गुंडेराव ढोने (२८, अंबाझरी) असे आरोपीचे नाव आहे. २९ सप्टेंबर २०२२ रोजी त्याने अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीचा ती मॉर्निंग वॉकला गेली असताना विनयभंग केला होता. तरुणीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले होते. संबंधित प्रकरण न्यायालयात सुरू आहे.

तरुणीने पोलिसांत तक्रार केल्याने सनी संतापला होता व त्याने काही वेळा तरुणीचा पाठलागदेखील केला. रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तरुणी सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वॉकला निघाली असता सनी तेथे पोहोचला व त्याने तिचा पाठलाग केला. त्याने अश्लिल हावभाव करत तिला थांबविले व विनयभंग केला. तो इतक्यावरच थांबला नाही, तर केस मागे घे नाहीतर ठार मारेन, अशी धमकीदेखील दिली. त्यानंतर तो फरार झाला. तरुणीने सिताबर्डी पोलीस ठाणे गाठून सनीविरोधात तक्रार केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: After complaining of molestation, the girl was molested again by the angry accused