शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तीन फेऱ्यांमध्ये मिळालेल्या पसंतीच्या कॉलेजमध्येच घ्यावा लागेल प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:03 IST

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल : तीनऐवजी होणार चार प्रवेश फेऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात सीईटीचे निकाल जाहीर झाल्यानंतरही अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली नाही. दरम्यान तंत्रशिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेत काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये मिळालेले अनुक्रमे एक, तीन किंवा सहा पैकी कोणतेही पसंतीच्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य असेल.

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील बदलांबाबत अधिसूचना जारी केली आहे. वरील नियम राज्यभरातील विनाअनुदानित, खासगी व्यावसायिक संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी लागू राहतील. यावेळी प्रक्रियेत तीन ऐवजी चार कॅप राउंड होतील.

चौथ्या फेरीनंतर कोणतीही सुधारणा होणार नाही. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या जागांची माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. तसेच, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्याची किंवा मागील फेरीत भरलेले ऑप्शन बदलण्याची संधी मिळेल. जर अर्जाच्या वेळी विद्यार्थ्याने पसंत केलेल्या महाविद्यालयाच्या पसंतीनुसार पहिल्या यादीतील पहिले महाविद्यालय, दुसऱ्या यादीतील पहिले तीन महाविद्यालय आणि तिसऱ्या यादीतील पहिल्या ६ महाविद्यालयात सीट मिळाली, तर प्रवेश निश्चित मानला जाईल.

हे विद्यार्थी पुढील फेरीसाठी पात्र राहणार नाहीत. म्हणजेच या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे अनिवार्य असेल. याशिवाय, चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरच संस्थात्मक प्रवेश फेऱ्या घेतल्या जातील. त्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. जर या फेरीत संस्थेने अर्ज नाकारला तर विद्यार्थी सीईटी सेलच्या वेबसाइटवर अर्ज करू शकतील.

कॉलेज कोट्याच्या प्रवेशासाठी भरावे लागेल तीनपट शुल्ककॉलेज कोट्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून संस्था निर्धारित शुल्काच्या तीन पट अधिक शुल्क आकारू शकते. तर, अनिवासी भारतीय कोट्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पाच पट अधिक शुल्क आकारले जाऊ शकते. चारही फेऱ्याची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संस्थात्मक कोट्याची घोषणा केली जाईल. विद्यार्थी चारही फेऱ्यांमध्ये संस्थात्मक कोट्याच्या जागांसाठी अर्ज करू शकतात. संस्थांना या फेरीची प्रक्रिया देखील गुणवत्तेच्या आधारे पूर्ण करावी लागेल. संस्थांना वेबसाइटवर गुणवत्ता यादी प्रकाशित करणे बंधनकारक असेल.

टॅग्स :Admissionप्रवेश प्रक्रियाnagpurनागपूर