शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांकडून प्रशासनाची पोलखोल

By admin | Updated: September 13, 2014 02:44 IST

सुरुवातीचे दोन दिवस ‘नॅक’ (नॅशनल असेसमेंट अ‍ॅन्ड अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल) समितीसमोर ‘आॅल इज वेल’ असा ‘परफॉर्मन्स’ देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ...

नागपूर : सुरुवातीचे दोन दिवस ‘नॅक’ (नॅशनल असेसमेंट अ‍ॅन्ड अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल) समितीसमोर ‘आॅल इज वेल’ असा ‘परफॉर्मन्स’ देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनासाठी शुक्रवारचा दिवस फारसा चांगला ठरला नाही. ‘नॅक’ समितीच्या सदस्यांसमोर निरनिराळ्या विभागांतील विद्यार्थ्यांनी समस्यांचा पाढाच वाचला. ‘नॅक’ समितीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांची बाजू विस्तृतपणे ऐकून घेतली. विद्यापीठाने वेगवेगळ्या बाबतीत केलेल्या दाव्यांची विद्यार्थ्यांच्या स्पष्टोक्तीने पोलखोल झाली.‘नॅक’ समितीने सुरुवातीचे दोन दिवस विद्यापीठातील निरनिराळ्या विभागांची पाहणी केली होती. कर्नाटक विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.ए.एम.पठाण यांच्या नेतृत्वाखालील ‘नॅक’ समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी गुरुनानक भवन येथे दुपारच्या सुमारास विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी विद्यापीठातील अधिकाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. विद्यापीठातील सत्य स्थिती कथन करावी, सर्वांची नावे गुप्त राहतील, असे आश्वासन समितीच्या सदस्यांनी दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकानंतर एक समस्या मांडल्या.बहुतांश विद्यार्थ्यांनी विभागांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात शिक्षक नसल्याचा मुद्दा मांडला. शिक्षकच नाही, त्यामुळे नियमित वर्ग होत नाही. एका विभागाचे विभागप्रमुख तर कधीच वर्गावर येत नाही असे विद्यार्थ्यांनी सांगितले. यासोबतच अनेक विभागात मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, असेदेखील विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यापीठात ‘प्लेसमेंट’ची टक्केवारी कशी आहे, असा प्रश्न समितीच्या सदस्यांनी विचारला. परंतु विद्यापीठातील ‘प्लेसमेंट सेल’ केवळ नावापुरताच असून त्याचा विद्यार्थ्यांना काहीही फायदा नाही, असे स्पष्टपणे विद्यार्थ्यांनी सांगितले. ‘नॅक’ समितीच्या सदस्यांनी निरनिराळ्या मुद्यांवर विद्यार्थ्यांची मतं जाणून घेतली.काणे सरांच्या ‘क्लास’चा फायदा नाही‘नॅक’ समितीसोबत होणाऱ्या संवादासाठी विद्यापीठाने विशेष तयारी केली होती. ‘आयक्यूएसी’तर्फे (इंटर्नल क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स सेल)काही दिवसांअगोदर याची रंगीत तालीम घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना कुठल्या प्रश्नांना कशा प्रकारे उत्तर द्यायचे आहे याचे मार्गदर्शन ‘आयक्यूएसी’ संचालक डॉ. सिद्धार्थ काणे यांनी केले होते. परंतु विद्यापीठातील समस्यांमुळे सहन कराव्या लागणाऱ्या मनस्तापातून अखेर विद्यार्थ्यांनी समस्या मांडल्याच.(प्रतिनिधी)