नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यासाठी अपर मुख्य सचिव नागपुरात

By गणेश हुड | Published: October 6, 2023 01:07 PM2023-10-06T13:07:15+5:302023-10-06T13:07:56+5:30

नागपुरातील वनामती येथे बैठक

Additional Chief Secretary in Nagpur to take stock of the natural calamity |  नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यासाठी अपर मुख्य सचिव नागपुरात

 नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यासाठी अपर मुख्य सचिव नागपुरात

googlenewsNext

नागपूर : रब्बी हंगामाचे नियोजन आणि नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार शुक्रवारी नागपुरातील वनामती येथे बैठक घेत आहेत.

वनामती येथे त्यांचे आगमन प्रसंगी  वनामतीच्या संचालक डॉ मीताली सेठी, विभागीय अधिक्षक कृषि अधिकारी  मिलिंद शेंडे, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक रामराव मेश्राम, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे,  महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक श्रीचिरूटकर, पिक विमा कंपनी आयसीआयसीआय लोंबार्डचे अमन वर्मा, राहुल सनान्से, वनामतीचे कृषि उपसंचालक सुबोध मोहरील व  ठोंबरे  आदी उपस्थित होते.

सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे नागपूर विभागातील शेतपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Additional Chief Secretary in Nagpur to take stock of the natural calamity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर