शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

खासगी इस्पितळ प्रशासनाला धमकावणारे रॅकेट सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 21:29 IST

शहरातील खासगी इस्पितळाच्या संचालकांना विशिष्ट हेतूने धमकावणारे, खोट्या तक्रारी करणारे एक रॅकेट सक्रिय असून यात महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांचाही समावेश असल्याची संशयवजा माहिती चर्चेला आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील खासगी इस्पितळाच्या संचालकांना विशिष्ट हेतूने धमकावणारे, खोट्या तक्रारी करणारे एक रॅकेट सक्रिय असून यात महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांचाही समावेश असल्याची संशयवजा माहिती चर्चेला आली आहे.विशेष म्हणजे, काही चर्चित व्यक्तींची बदनामी करून त्यांचा राजकीय गेम करण्याचा कट रचण्याचे संभाषण असलेली आॅडिओ क्लीप पोलिसांना मिळालेली आहे. त्या क्लीपमधून साहिलचे कनेक्शन पुढे आल्याची माहिती आहे.साहिल सय्यद आणि गंटावार या दोघांच्या अर्थपूर्ण संबंधाच्याही पोलिसांना तक्रारी मिळाल्या आहेत. यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गुन्हे शाखेला गुरुवारी चौकशीचे आदेश दिले. मानकापूर पोलिसांनी एलेक्सिस इस्पितळाचे डॉ. तुषार गावडे यांच्या तक्रारीवरून नुकताच साहिल सय्यद आणि त्याच्या पाच ते सात साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेच्या तपासणी अहवालाच्या मुद्यावरून साहिल आणि त्याच्या साथीदारांनी इस्पितळात गोंधळ घातला होता. डॉक्टरांना जिवे मारण्याची धमकी देऊन इस्पितळाची इमारत बुलडोझरने पाडण्याची धमकीही दिली होती. इस्पितळ प्रशासनाने तक्रार नोंदविल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. साहिल सय्यद हा खासगी इस्पितळात जाऊन डॉक्टरांना धमकावतो. त्यांच्याशी वाद घालतो. त्यानंतर इस्पितळात अनियमितता असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेकडे करतो. महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी गंटावार यांच्याशी साहिलची खास मैत्री असल्याची चर्चा असतानाच गुरुवारी एक खळबळजनक आॅडिओ क्लीप पोलिसांना मिळाली. त्यात काही चर्चित व्यक्तींना बदनाम करण्यासाठी चर्चा केली जात असल्याचे समजते. या संबंधाने मिळालेल्या तक्रारी आणि आॅडिओ क्लीपची प्राथमिक चौकशी केली असता पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे गंटावार-साहिलच्या संबंधासोबतच इस्पितळ प्रशासनाच्या तक्रारी करणाऱ्या रॅकेटची कसून चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला दिले आहे.गुन्हेगारी अहवाल बाहेरसाहिल सय्यद यापूर्वीही अनेक प्रकरणात चर्चेला आला आहे. बनावट तक्रारी करून गंटावार सोबत संगनमत करून विशिष्ट हेतूने तो इस्पितळाच्या संचालकांना धमकावत असल्याचीही जोरदार चर्चा आहे. काही वर्षांपूर्वी ऑटोडील करणारा साहिल अचानक लाखोंचे व्यवहार करून नेतागिरी करू लागला. पोलिसांनी त्याचा गुन्हेगारी अहवाल बाहेर काढला असून त्याची मालमत्ता अन साथीदारांचीही पोलीस आता कसून चौकशी करीत आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलExtortionखंडणी