शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

केतकी चितळे यांच्यावर कारवाई होते, मग शेख हुसेन यांच्यावर का नाही?; भाजपाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 17:23 IST

Shaikh Hussain Should arrest, BJP demands : अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर कारवाई होते, मग शेख हुसैन यांच्यावर का नाही? असा प्रश्न देखील भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. 

नागपूरात काँग्रेस नेता शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिल्याचं प्रकरण खूप गाजत आहे. याप्रकरणी भाजपाने आक्रमक पवित्र घेत शेख हुसेन यांना अटक करण्याची मागणी केली आहे. अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर कारवाई होते, मग शेख हुसैन यांच्यावर का नाही? असा प्रश्न देखील भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. पोलीसांना तीन दिवस वेळ देऊ, शेख हुसेन यांना अटक झाली नाही तर न्यायालयात जाणार असल्याचं देखील बावनकुळे म्हणाले. तसेच नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत ‘थप्पड’ शब्द वापरला तेव्हा त्यांना अटक केली. मग शेख हुसेन यांनी पंतप्रधान यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अटकेची कारवाई का नाही?, नागपूर पोलीस दबावात आहे का? असा भाजप नेत्यांचा नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सवाल केला आहे. हुसेन यांच्याशिवाय ‘त्या' कार्यक्रमात उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल करा’, ‘मंत्री नितीन राऊत, मंत्री विजय वडेट्टीवार, आ. विकास ठाकरे, आ. अभिजीत वंजारी, राजेंद्र मुळक यांनी पंतप्रधान यांच्याबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा’ याबाबत भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे नागपूर पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. नागपुरात ईडी विरोधात झालेल्या झालेल्या आंदोलनात बोलताना शेख हुसेन यांनी वक्तव्य केलं होतं. बावनकुळे यांच्यासोबत आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख आणि इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते. 

घडलेल्या घटनेनंतर आम्ही लगेच गुन्हा दाखल केला. नॅान बेलेबल असल्याने जामीन झाला. आता भाजपच्या निवेदनानंतर आणखी काय कलम लावता येईल याबाबत कायदेशीर कारवाई करु, शेख हुसेन यांच्याबाबत ताज बाबा ट्रस्टमधील काही गैरव्यवहाराची तक्रार आली होती. त्याबाबत माहिती घेऊ. पोलीसांवर कुणाचाही दबाव नाही, आम्ही कायद्यानुसार कारवाई करतोय असे नागपूर पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीnagpurनागपूरcommissionerआयुक्तPoliceपोलिसArrestअटकKetaki Chitaleकेतकी चितळेBJPभाजपाcongressकाँग्रेस