शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

लर्निंग लायसन्सची परीक्षा देणाऱ्या अनधिकृत व्यक्तीवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने घरी बसून शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. मात्र ...

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने घरी बसून शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. मात्र काही ठिकाणी शिकाऊ उमेदवाराऐवजी अनधिकृत व्यक्ती लर्निंग लायसन्सची परीक्षा देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. बोगस परीक्षार्थी लर्निंग लायसन्स काढत असल्यास त्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल, असे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी कळविले आहे. परंतु या संदर्भातील तक्रार करणार कोण, हा प्रश्न आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी परीक्षा देणे आवश्यक आहे. संबंधित अर्जदारास वाहतूक नियमांचे, चिन्हांचे व वाहनचालकांच्या जबाबदारीचे महत्त्व सांगणारी ही परीक्षा असते. या प्रणालीचा वापर करतांनी पालकांनी त्यांच्या पाल्यांना परीक्षेचे महत्त्व पटवून दिल्यास, या प्रणालीचा गैरवापर होणार नाही, असे आवाहनही जाधव यांनी केले आहे. परंतु परीक्षा देणाऱ्यानेच अनधिकृत व्यक्तीची मदत घेतल्यास याची तक्रार करणार कोण, हा प्रश्न आहे.

-तर, लायसन्ससाठी कायमस्वरुपी अपात्र

या प्रकरणात दोषी आढळणारा अर्जदार मोटार वाहन कायद्यानुसार लायसन्ससाठी कायमस्वरुपी अपात्र ठरणार आहे. अशा कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याच बरोबर महा-ई-सेवा केंद्र, ड्रायव्हिंग स्कूल व इंटरनेट कॅफेचा गैरवापर करणाऱ्या संस्था विरुद्धही कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी गैरप्रकाराच्या विरोधात आरटीओ कार्यालयात तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.