शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

नागपुरात उपद्रवी वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 1:02 AM

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रॅलीच्या नावाखाली रस्त्यावर गोंधळ घालू पाहणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४६४५ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.

ठळक मुद्देवाहतूक शाखेची विशेष मोहीम : ११६ वाहनेही ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रॅलीच्या नावाखाली रस्त्यावर गोंधळ घालू पाहणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४६४५ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. शहरातील विविध मार्गावर उपद्रवी वाहनचालक आरडाओरड करून गोंधळ घालतात. वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे अपघातही होतात.फुटाळा परिसरात तर त्यांचा हैदोसच असतो. स्वातंत्र्यदिनाचा सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा करता यावा आणि या राष्ट्रीय सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून, उपद्रवी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना देण्यात आले होते. त्यानुसार, उपद्रवी वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी १४ आॅगस्टच्या सायंकाळपासूनच विशेष मोहीम राबविण्यात आली.या विशेष मोहिमेंतर्गत पोलिसांनी ट्रीपल सीट दुचाकी चालविणारे २५५, राँग साईड वाहन चालविणे ५४, दारूच्या नशेत वाहन चालविणे ४९, बेदरकारपणे वाहन चालविणे १७ तसेच नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणाऱ्या २७१ जणांवर कारवाई केली. ९१४ वाहनचालकांना जागच्या जागी चालान देण्यात आले. तर सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे सिग्नल तोडून पळणाऱ्या २०२१ वाहनचालकांना ई-चलान पाठविण्यात आले. १७१० वाहनचालकांवर फोटोच्या आधारे (सिग्नलवर फोटो काढून) फोटो ई-चालान कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ४६४५ वाहनचालकांवर वेगवेगळी कारवाई करण्यात आली. कागदपत्रे न बाळगणाऱ्या ११६ चालकांकडून त्यांची वाहने तात्पुरती ताब्यात घेण्यात आली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूर