नागपुरात प्लास्टिक वापरणाऱ्या १२९८ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 08:55 PM2019-11-19T20:55:09+5:302019-11-19T20:56:50+5:30

प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करून प्लास्टिक विक्री व वापर करणाऱ्यांवर कारवाईला वेग आला आहे. महापालिकेचे उपद्रव शोध पथक व झोनस्तरावरील नियुक्त चमूकडून आतापर्यंत १२९८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

Action against 1298 people who use plastic in Nagpur | नागपुरात प्लास्टिक वापरणाऱ्या १२९८ जणांवर कारवाई

नागपुरात प्लास्टिक वापरणाऱ्या १२९८ जणांवर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्दे६६.९० लाखांचा दंड वसूल : मनपा उपद्रव शोध पथकाची कामगिरी : एका दुकानदारावर फौजदारी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करून प्लास्टिक विक्री व वापर करणाऱ्यांवर कारवाईला वेग आला आहे. महापालिकेचे उपद्रव शोध पथक व झोनस्तरावरील नियुक्त चमूकडून आतापर्यंत १२९८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर लक्ष्मीनगरमधील एका दुकानदारावर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.
उपद्रव शोध पथकाचे स्कॉड लिडर विरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथकाद्वारे संपूर्ण शहरात प्लास्टिक बंदीबाबत कारवाई सुरू आहे. नागपूर महापालिकेतर्फे उपद्रव शोध पथक तैनात करण्यात आले आहे. झोन स्तरावर पथकाची नेमणूक करण्यात आली असून पथकामध्ये ८७ जणांचा समावेश आहे.
उपद्रव शोध पथक व झोनस्तरावरील चमूकडून २३ जून २०१८ ते १५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीमध्ये दहाही झोनमध्ये १२९८ जणांवर कारवाई करून ६६ लाख ९० हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये ९४ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे तर संपूर्ण कारवाईमधून २३९१०.२२० किलोग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

आसीनगर झोनमध्ये सर्वाधिक कारवाई
मनपा उपद्रव शोध पथक व झोनस्तरावरील पथकाकडून आलेल्या कारवाईमध्ये दहाही झोनमध्ये सर्वाधिक कारवाई आसीनगर झोनमध्ये करण्यात आली आहे. आसीनगर झोनमध्ये सर्वाधिक २१८ जणांवर कारवाई करून यामधील २१ जणांना नोटीस बजावण्यात आली. कारवाईमधून ८१५.०७० किलोग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच १२ लाख १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. धरमपेठ झोनमध्ये १९१ जणांवर कारवाई करून ९ लाख ९६ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. झोनमध्ये ९ जणांना नोटीस बजावण्यात आले असून १५४६.४०० किलोग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. प्लास्टिक कारवाईमध्ये तिसऱ्या क्रमांकावर मंगळवारी झोनमध्ये कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी झोनमधील १५१ जणांवर करण्यात आलेल्या कारवाईमधून ७ लाख ५२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर १६ जणांना नोटीस बजावण्यात आली. मंगळवारी झोनमधून २०४१.२५५ किलोग्रॅम प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Action against 1298 people who use plastic in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.