'अभिनय चिंतन : भरतमुनी ते बेर्टोल्ट ब्रेख्त’चे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:49 IST2018-03-29T23:46:57+5:302018-03-29T23:49:40+5:30
नाटककार, दिग्दर्शक डॉ. पराग घोंगे यांच्या अभिनय चिंतन : भरतमुनी ते बेर्टोल्ट ब्रेख्त या संशोधनपर ग्रंथाचे प्रकाशन जागतिक रंगभूमी दिनाच्या पर्वावर पार पडले. विदर्भ साहित्य संघ ग्रंथसहवास, अखिल भारतीय नाट्य परिषद नागपूर शाखा आणि अखिल भारतीय नाट्य परिषद महानगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार २७ मार्च रोजी सायंटिफिक सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

'अभिनय चिंतन : भरतमुनी ते बेर्टोल्ट ब्रेख्त’चे प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाटककार, दिग्दर्शक डॉ. पराग घोंगे यांच्या अभिनय चिंतन : भरतमुनी ते बेर्टोल्ट ब्रेख्त या संशोधनपर ग्रंथाचे प्रकाशन जागतिक रंगभूमी दिनाच्या पर्वावर पार पडले. विदर्भ साहित्य संघ ग्रंथसहवास, अखिल भारतीय नाट्य परिषद नागपूर शाखा आणि अखिल भारतीय नाट्य परिषद महानगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार २७ मार्च रोजी सायंटिफिक सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भरतमुनी, स्तनिस्लावस्की, आॅर्तो, ग्रोटोवस्की आणि ब्रेख्त यांच्या अभिनय चिंतनांचा तौलनिक अभ्यास या पुस्तकात डॉ. पराग घोंगे यांनी सादर केला आहे. जागतिक रंगभूमीवरील गेल्या अडीच हजार वर्षांतील कालजायी नाटकातील निवडक स्वागतांचा अभिनयाविष्कार या कार्यक्रमांतर्गत नागपुरातील जुन्या-नव्या कलावंतानी दमदारपणे सादर केला. इसवी सन पूर्व ४२९ ते १९७० या कालखंडातील निवडक जगप्रसिद्ध नाटकातील स्वगते या कार्यक्रमात सादर झालीत. सोफोक्लीज याच्या किंग एडिपस या नाटकातील योकास्ता राणीचे स्वगत दीपाली घोंगे, कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलमधील शकुंतलेचे स्वागत गौरी सोनटक्के, क्रिस्टोफर मार्लो यांच्या डॉ. फोस्टस नाटकातील स्वगत सुपंथ भट्टाचार्य, शेक्सपिअरच्या हॅम्लेट आणि किंग लिअर या नाटकातील स्वगते अनुक्रमे गौरव खोंड आणि प्रकाश लुंगे, हेन्रिक इब्सेन यांच्या अ डॉल्स हाऊस नाटकातील स्वगत माणिक सोहोनी, चेकोवच्या चेरी आॅर्चर्ड नाटकातील स्वगत सीमा गोडबोले, लुईजी पिरांदेलो यांच्या सिक्स कारेक्टर्स इन सर्च आॅफ अन आॅथर या नाटकातील स्वगत नीलकांत कुलसंगे, बेर्टोल्ट ब्रेख्त यांच्या मदर करेज या नाटकातील स्वगत श्रद्धा भारद्वाज, टेनिसी विलियम यांच्या अ स्ट्रीट कार नेम्ड डीसायर या नाटकातील स्वगत पूजा पिंपळकर, बेकेटच्या वेटिंग फोर गोदो या नाटकातील स्वगत सलीम शेख आणि दारिओ फो याच्या अकसिडेंटल डेथ आॅफ अन अनार्चीस्त या नाटकातील स्वगत विनोद तुंबडे या कलाकारांनी सादर केलीत. या कार्यक्रमाची संकल्पना दिलीप म्हैसाळकर यांची होती.