शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: November 1, 2015 03:25 IST

महसूल विभागातील उच्चपदस्थ अधिकारी उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार आणि कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरींचा ...

बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट चालविण्याचे प्रकरणनागपूर : महसूल विभागातील उच्चपदस्थ अधिकारी उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार आणि कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरींचा आणि रबरी शिक्क्यांचा वापर करून जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र , अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्नाच्या प्रमाणपत्राचे मोठे रॅकेट चालविणाऱ्या एका आरोपीचा जामीन अर्ज तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. सुनील चंद्रभान रंगारी, असे आरोपीचे नाव आहे. तो या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आहे. प्रकरण असे की, नायब तहसीलदार आभा विनय बोरकर यांना २२ सप्टेंबर २०१५ रोजी तहसील कार्यालय परिसरात योगेश गोपाल मारकंडे आणि संध्या रामचंद्र आवळे हे दोघे उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार आणि कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी आणि रबरी शिक्के असलेले जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र जवळ बाळगताना आढळून आले होते. चौकशीत या दोघांनी हे प्रमाणपत्र तहसील कार्यालयाच्या आवारात वावरणाऱ्या ३० वर्षीय ऋषी नावाच्या इसमाने बनवून दिल्याचे सांगितले होते. या प्रकरणी आरोपींविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात भादंविच्या ४६५, ४६८, ४७३, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अरविंद नत्थू मेश्राम, सुनील रंगारी आणि कपिल चौधरी यांना अटक करण्यात आली होती. आरोपींनी जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समतानगर येथे भाड्याने खोली घेतली होती. या ठिकाणी ते हे प्रमाणपत्र तयार करीत होते. या ठिकाणाहून संगणक, मोठ्या प्रमाणावर बनावट स्टॅम्प आणि प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली होती. सुनील रंगारी याने जामिनासाठी दाखल केलेला अर्ज प्रकरण गंभीर असल्याने फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील विलास राऊत आणि दीपेश पराते यांनी काम पाहिले. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस. जी. जमदडे हे आहेत. (प्रतिनिधी)