शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

...अन् पोलिसांच्या तावडीतून निसटला चोरटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 15:19 IST

नागपूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतर गुन्हेगार साथीदारांच्या मदतीने घरफोडी करणारा आरोपी पंकज उरकुडेला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले असता ...

ठळक मुद्देअपहरणाच्या गुन्हातील आरोपीउपचारासाठी नेताना दिला गुंगारामध्यरात्री पोलिसांच्या तावडीतून निसटला

नागपूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतर गुन्हेगार साथीदारांच्या मदतीने घरफोडी करणारा आरोपी पंकज उरकुडेला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले असता तो पोलिसांच्या तावडीतून फरार झाला. मंगळवारी रात्री मेडिकलमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पोलिसात खळबळ उडाली आहे.

पंकजला सोनेगाव पोलिसांनी चोरीच्या दोन प्रकरणात अटक केली होती. त्याने खामलाच्या कुख्यात प्रणव ठाकरेच्या सांगण्यावरून ही घटना घडवून आणली होती. पंकज अल्पवयीन मुलीचे अपहरण करून फरार झाला होता. अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार होता. दरम्यान प्रणवशी त्याची ओळख झाली. प्रणवने त्याला अमरावतीच्या मोर्शी येथे लपविले. ८ जानेवारीला सोनेगाव पोलिसांनी मोर्शीवरून त्यास अटक करून १.४५ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

पंकज १२ जानेवारीपर्यंत सोनेगाव पोलिसांच्या ताब्यात होता. मंगळवारी सायंकाळी त्याला उलटी होत होती. पंकजने तब्येत बरी नसल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. रात्री १०.४५ वाजता दोन हवालदार अणि एका शिपायाने त्याला मेडिकलमध्ये आणले. तेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यास सलाईन लावले. उपचारानंतर त्याला डॉक्टरांनी नेण्यास सांगितले.

रात्री १.४५ वाजता पोलीस त्याला वाहनात बसवून नेत असताना त्याने पोलिसांना झटका देऊन पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. परंतु रात्रीची वेळ असल्यामुळे पंकज फरार झाला. पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिली. पोलिसांनी पंकजच्या घरी तसेच इतर ठिकाणी शोध घेतला. त्याचा शोध न लागल्यामुळे पोलिसांनी फरार झाल्याचा गुन्हा दाखल केला. उपचारादरम्यान पंकजने हाताला बांधलेल्या दोरीची पकड ढिली केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीThiefचोरPoliceपोलिस