रुमवर चल म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस अटक
By दयानंद पाईकराव | Updated: August 26, 2023 18:01 IST2023-08-26T18:00:11+5:302023-08-26T18:01:22+5:30
पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

रुमवर चल म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस अटक
नागपूर : खुप दिवस पाठलाग करून एका दिवशी माझ्यासोबत रुमवर चल असे म्हणून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पाचपावली पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
श्याम अरुण सुने (वय ३०, रा. पाचपावली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पिडीत १५ वर्षीय मुलीच्या वस्तीत राहतो. पिडीत मुलगी दहाविला शिकत आहे. आरोपी श्याम हा बेरोजगार असून त्याला दारुचे व्यसन आहे. शुक्रवारी २५ ऑगस्टला पिडीत अल्पवयीन मुलगी ट्युशनला जात असताना आरोपी शामने तिचा पाठलाग केला. तीला रस्त्यात अडवून तिचा हात पकडला. माझ्यासोबत रुमवर चल असे म्हणून आरोपीने तिच्या शरीराला हात लावला व तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.
पिडीत मुलीने त्याला हटकले असता आरोपीने तिच्या गालावर थापड मारून तिला धमकी दिली. या प्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली ठाण्याचे उपनिरीक्षक महादेव नाईकवाड यांनी आरोपीविरुद्ध कलम ३५४, ३५४ (अ), ३५४ (ड), २९४, ३२३, ५०६, सहकलम ८, १२, पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. पुढील तपास पाचपावली पोलिस करीत आहेत.