लग्नाला निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:15 IST2018-04-20T01:15:46+5:302018-04-20T01:15:57+5:30

दुचाकीला स्टार बसच्या चालकाने धडक दिल्यामुळे लग्नाला निघालेल्या प्रणय संतोष वाघ (वय २४, रा. मनीषनगर) याचा करुण अंत झाला. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास भंडारा मार्गावरील एका मद्याच्या दुकानासमोर हा भीषण अपघात घडला.

Accidental death of a youth who going for marriage ceremony | लग्नाला निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

लग्नाला निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

ठळक मुद्देस्टारबसच्या चालकाने घेतला बळी : कळमन्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकीला स्टार बसच्या चालकाने धडक दिल्यामुळे लग्नाला निघालेल्या प्रणय संतोष वाघ (वय २४, रा. मनीषनगर) याचा करुण अंत झाला. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास भंडारा मार्गावरील एका मद्याच्या दुकानासमोर हा भीषण अपघात घडला.
प्रणय अ‍ॅक्टिव्हाने तर त्याचे मित्र राहुल भावराव कवडती (वय २४, रा. श्रीशरणनगर, प्रतापनगर) आणि कुलदीप गाऊत्रे (वय २४) हे दोघे पल्सरने त्यांच्या मित्राच्या लग्नसमारंभासाठी गुरुवारी सकाळी तिरोडा (जि. भंडारा) येथे जात होते. भंडारा मार्गावरील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोखर वाईन शॉपजवळ एमएच ४०/ बीजे १९५५ क्रमांकाच्या आरोपी स्टार बसचालकाने प्रणयच्या अ‍ॅक्टिव्हाला जोरदार धडक मारली. त्यामुळे प्रणयचा करुण अंत झाला. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच कळमना पोलिसांनी धाव घेतली. अपघातस्थळाचे वातावरण निवळल्यानंतर पोलिसांनी आरोपी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
लग्नसमारंभात शोककळा
प्रणयच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच लग्नसमारंभाच्या ठिकाणी शोककळा पसरली. त्याचे अनेक मित्र मोठ्या संख्येत कळमन्यात पोहचले. या अपघातामुळे प्रणयच्या निवासस्थान परिसरातही तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Accidental death of a youth who going for marriage ceremony