लग्नाच्या पत्रिका वाटायला निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:49 IST2019-04-10T00:49:08+5:302019-04-10T00:49:43+5:30

मित्रासोबत लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या वाघधरा - गुमगाव (ता. हिंगणा) येथील एका तरुणाचा अपघातात करुण अंत झाला. शुभम रमेश लहाने (वय २१)असे मृत तरुणाचे नाव आहे. पारडी चौकाजवळ मंगळवारी दुपारी १. ३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

Accidental death of a young man who is distributing own marriage cards | लग्नाच्या पत्रिका वाटायला निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

लग्नाच्या पत्रिका वाटायला निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

ठळक मुद्देनागपूरच्या पारडी (कळमना) चौकाजवळ भरधाव ट्रकने उडवले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मित्रासोबत लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या वाघधरा - गुमगाव (ता. हिंगणा) येथील एका तरुणाचा अपघातात करुण अंत झाला. शुभम रमेश लहाने (वय २१)असे मृत तरुणाचे नाव आहे. पारडी चौकाजवळ मंगळवारी दुपारी १. ३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
गावातील चंदू अशोक वैद्य (वय २८) याच्यासोबत शुभम मोटरसायकलने (एमएच ४०/ एजी २८५५) लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी मौदा येथे गेला होता. मंगळवारी दुपारी १. ३० वाजता तिकडून परत येताना पारडी (कळमना) चौकाजवळ भरधाव ट्रकच्या चालकाने मोटरसायकलला धडक दिली. त्यामुळे शुभम आणि चंदू गंभीर जखमी झाले. त्यांना डॉक्टरकडे नेले असता शुभम लहानेला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर आरोपी ट्रकचालक पळून गेला. या अपघातामुळे पारडी चौकात मोठा तणाव निर्माण झाला. या भागात वारंवार अपघात घडतात. मात्र वाहतूक शाखा किंवा कळमना पोलीस त्याकडे गंभीरपणे लक्ष द्यायला तयार नाही. दरम्यान, जखमी चंदूने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अपघाताची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वाघधरा गावात तीव्र शोककळा पसरली.

Web Title: Accidental death of a young man who is distributing own marriage cards