नागपुरात अपघात सत्र : तिघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 00:46 IST2021-06-22T00:46:06+5:302021-06-22T00:46:35+5:30
Accident session एमआयडीसी, हुडकेश्वर व हिंगणा पोलिसांच्या हद्दीतील कान्होलीबारा येथे झालेल्या अपघातामध्ये तिघेजण ठार झाले, तर काही युवक जखमी झाले.

नागपुरात अपघात सत्र : तिघे ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमआयडीसी, हुडकेश्वर व हिंगणा पोलिसांच्या हद्दीतील कान्होलीबारा येथे झालेल्या अपघातामध्ये तिघेजण ठार झाले, तर काही युवक जखमी झाले.
पहिली घटना रविवारी दुपारी ३.३० वाजता एमआयडीसी हद्दीत घडली. वानाडोंगरी येथील फिर्यादी रितेश जयंत सोनुने (वय २९) हे आई छाया (५१) यांच्यासोबत दुचाकीने घरी येत हाेते. दरम्यान, राजीवनगर येथे त्यांच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे छाया गंभीर जखमी होऊन मरण पावल्या. दुसरी घटना कान्होलीबारा येथील पेट्रोल पंपापुढे घडली. कान्होलीबारा येथील रमेश बुधबावरे (४५) हे दुपारी ३.३० च्या सुमारास दुचाकीने शुभांगी बुधबावरे व ६ वर्षीय मुलीसोबत जात होते. दरम्यान, दुसऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यामुळे रमेश यांचा मृत्यू झाला.
तिसरी घटना सायंकाळी ६.३० च्या सुमारास हुडकेश्वर ग्रामपंचायत कार्यालयापुढे घडली. आराेपी अंशू मिथिलेश शर्मा (२४) हा मित्र प्रवीण आत्राम (२२), अमर आत्राम व इतरांसह कारने हुडकेश्वर खुर्द येथे जात होता. ते मस्कासाथ येथून पार्टी करून परतत होते. त्यांची कार उलटली. त्यामुळे प्रवीणचा मृत्यू झाला व इतर युवक गंभीर जखमी झाले.