शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

नागपुरातील चिंचभवन पुलावर अपघात : आजी-नातवासह तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 10:36 PM

दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातात आजी व नातवासह तिघांचा मृत्यू झाला. १८ तासाच्या आत झालेल्या या अपघातामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. आजी व नातवला चिरडणाऱ्या वाहनाचा पत्ता न लागल्यामुळे नातेवाईकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे.

ठळक मुद्देकुटुंबीयांमध्ये तीव्र रोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातात आजी व नातवासह तिघांचा मृत्यू झाला. १८ तासाच्या आत झालेल्या या अपघातामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. आजी व नातवला चिरडणाऱ्या वाहनाचा पत्ता न लागल्यामुळे नातेवाईकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे.पहिला अपघात बुधवारी दुपारी १.४५ च्या सुमारास वर्धा रोडवरील चिंचभवन पुलाजवळ घडला. इंदू काशीनाथ खोडे (७०) त्यांचा नातू इशांत नारायणराव खोडे (१६) रा. काचुरे ले-आऊट चिंचभवन अशी मृतांची नावे आहे. तसेच आदित्य रामभाऊ निंबाळकर (२०) रा.एमआयजी कॉलनी, त्रिमूर्तीनगर हा जखमी आहे. तिघेही अ‍ॅक्टीव्हाने (एमएच/३१/ईडब्ल्यू/३८३१) चिंचभवनकडे जात होते. आदित्य गाडी चालवित होता. त्याच्या मागे इशांत आणि त्याची आजी इंदू हे बसले होते. चिंचभवन पुलाजवळ अज्ञात वाहनाने अ‍ॅक्टीव्हाला जोरदार धडक दिली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. वाहनाच्या चाकात आल्याने इंशात व इंदू यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी आदित्यला रुग्णालयात दाखल करण्यात आले.दुपारची वेळ असल्याने पुलावर वर्दळही कमी होती. पोलिसांनी घटनास्थळी जमलेल्या लोकांना विचारपूस केली. त्यांच्याकडून धडक देणारे वाहन ट्रक किंवा ट्रेलर असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी खोडे कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती होताच खोडे कुटुंबात शोक पसरला. त्यांनी आरोपी वाहन चालकाचा पत्ता लावून त्याला तातडीने अटक करण्याची मागणी केली. सोनेगाव पेलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. चिंचभवन पुलावर सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांनाही वाहनाचा शोध लावण्यात अडचण येत आहे. परंतु या रस्त्यावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही आहे. त्याच्या मदतीने आरोपी वाहन चालकाचा शोध घेता येऊ शकतो, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.चिंचभवन परिसरात नेहमीच अपघात होत असतात. ते रोखण्यसाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी वेळोवेळी केली जाते. परंतु यादृष्टीने ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्याने अपघात कमी होताना दिसून येत नाही. जखमी आदित्यची प्रकृतीही चिंताजनक आहे.दुसरा अपघात मंगळवारी रात्री कळमना येथील डिप्टी सिग्नलजवळ घडला. गुलमोहरनगर येथील रहिवासी ३७ वर्षीय सुरेश आसाराम पटले बाईकने डिप्टी सिग्नल रेल्वे क्रॉसिंगजवळून जात होता. त्याला ट्रक क्रमाक आर.जे. ०७ जी.डी. ४९६४ ने धडक दिली. जखमी सुरेशला रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू