शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यास क्षमा नाही

By admin | Updated: July 30, 2015 03:22 IST

राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या दोन मुख्याध्यापकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात क्षमा मिळाली नाही.

हायकोर्ट : एफआयआर रद्द करण्यास नकारनागपूर : राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या दोन मुख्याध्यापकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात क्षमा मिळाली नाही. न्यायालयाने या मुख्याध्यापकांविरुद्धचा एफआयआर रद्द करण्यास नकार दिला. प्रफुल्ल विजय अनिलवार (२८) व कविता उदयसिंग चौहान (२८) अशी मुख्याध्यापकांची नावे असून, ते अमरावती येथील रहिवासी आहेत. गेल्या महाराष्ट्रदिनी (१ मे) दोन्ही मुख्याध्यापकांच्या शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. नियमानुसार सूर्यास्तानंतर राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक खाली उतरविणे आवश्यक आहे. परंतु या दोन्ही मुख्याध्यापकांच्या शाळेत रात्री ११ वाजतापर्यंत राष्ट्रध्वज वरतीच लहरत होते. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर राष्ट्रध्वज खाली उतरविण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन्ही मुख्याध्यापकांविरुद्ध राष्ट्रीय ध्वज अवमान अधिनियमाच्या कलम २ अन्वये एफआयआर नोंदविला आहे. हा एफआयआर रद्द करण्यासाठी मुख्याध्यापकांनी उच्च न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता. हा गुन्हा जाणीवपूर्वक केला नाही, असे त्यांचे म्हणणे होते.न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. यामुळे संबंधित वकिलाने अर्ज मागे घेतला. शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी युक्तिवाद केला.(प्रतिनिधी)