इन्स्टाग्राम फ्रेंडवर अत्याचार, गर्भवती झाल्यावर घेतला यु-टर्न
By योगेश पांडे | Updated: August 9, 2023 15:50 IST2023-08-09T15:08:25+5:302023-08-09T15:50:50+5:30
नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

इन्स्टाग्राम फ्रेंडवर अत्याचार, गर्भवती झाल्यावर घेतला यु-टर्न
नागपूर : अल्पवयीन इन्स्टाग्राम फ्रेंडला अगोदर प्रेमाच्या जाळ्यात अडकविले व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ती गर्भवती झाल्याचे समजताच लग्नाच्या आश्वासनातून यु-टर्न घेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अभिषेक कमलाकर डोंगरे (१९, सद्भावना नगर, केडीके कॉलेजजवळ) याची एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. त्याने तिच्यावर प्रेमाचे जाळे फेकले व ती त्याच अलगदपणे अडकली. त्याने तिला लग्नाचे आश्वासन दिले व तिच्यावर अत्याचार केले. यातूनच ती गर्भवती झाली. तिने ही बाब अभिषेकला सांगितली असता त्याने हात वर केले व लग्न करणार नसल्याचे सांगितले. अखेर अल्पवयीन मुलीने नंदनवन पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.