शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणाचे तब्बल ५०० तर महाराष्ट्राचे फक्त ७५ मागास विद्यार्थी दरवर्षी जातात परदेशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 11:10 IST

Nagpur News महाराष्ट्र सरकार दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठविते. त्या तुलनेत कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातील दरवर्षीची संख्या ४०० ते ५०० विद्यार्थी इतकी आहे.

ठळक मुद्देमागासांना शिक्षणासाठी परदेशी पाठवण्यात महाराष्ट्राची पिछाडीच

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविणाऱ्या देशातील राज्य सरकारांमध्ये महाराष्ट्र राज्य हे कितीतरी मागे असल्याची बाब उघडकीस आली आहे. महाराष्ट्र सरकार दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठविते. त्या तुलनेत कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातील दरवर्षीची संख्या ४०० ते ५०० विद्यार्थी इतकी आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षणाची संधी मिळावी याकरिता महाराष्ट्रात २००३ पासून परदेशी शिष्यवृत्ती योजना लागू आहे. अनेक वर्षांपासून ७५ विद्यार्थ्यांची संख्या कायम आहे. ती वाढलेली नाही. त्यामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत आहे.

केंद्र सरकारसह विविध राज्यांतर्फेही परदेशी शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. केंद्र सरकार या योजनेंतर्गत दरवर्षी १०० विद्यार्थांचा खर्च उचलतो. दिल्लीसारखे छोटे राज्यही १०० मुलांना परदेशात पाठविते. कर्नाटक व आंध्र प्रदेश सरकार प्रत्येकी ४०० मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवते, तर तेलंगणा सरकार ५०० मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरवर्षी उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठविते. केरळ सरकारतर्फे तर विद्यार्थ्यांची कुठलीही मर्यादाच नाही. जितके विद्यार्थी अर्ज करतील त्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.

 

व्हिजन डॉक्युमेंटची अंमलबजावणी कधी?

राज्य सरकारतर्फे प्रत्येक विभागानुसार व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात आले होते. त्यानुसार सामाजिक न्याय विभागानेही आपले डॉक्युमेंट तयार केले. त्यात परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविण्यात येणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढविण्यात येणार होती. त्यानुसार २०१० पर्यंत ही संख्या १००, २०२० पर्यंत २०० व २०३० पर्यंत ३०० करण्यात येणार होती. सध्या २०२१ सुरू आहे; परंतु एकाही विद्यार्थ्याची संख्या वाढलेली नाही.

महाराष्ट्र सरकार सामाजिक न्यायाच्या केवळ बाता करते. घोषणा करते; परंतु प्रत्यक्षात कृती होताना दिसून येत नाही. दिल्ली, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा यासारख्या राज्यांपासून पुरोगामी महाराष्ट्राला खूप काही शिकण्याची गरज आहे.

अतुल खोब्रागडे, ‘खूप लढलो बेकीने, आता लढूया एकीने’ संघटना

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र