तरुणीला भर रस्त्यावर थांबवून विनयभंग, आरोपी अटकेत

By योगेश पांडे | Updated: September 22, 2023 14:11 IST2023-09-22T14:10:03+5:302023-09-22T14:11:12+5:30

रस्त्यात अडवून तो तिच्याशी बोलण्यासाठी जबरदस्ती करू लागला

A young woman was stopped on the street and molested, the accused arrested | तरुणीला भर रस्त्यावर थांबवून विनयभंग, आरोपी अटकेत

तरुणीला भर रस्त्यावर थांबवून विनयभंग, आरोपी अटकेत

नागपूर : एका तरुणीला भररस्त्यात थांबवून अगोदर तिला बोलण्यासाठी जबरदस्ती केली व त्यानंतर तिचा विनयभंग केला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ईकबाल शेख हाफीज शेख (२९, नंदनवन) असे आरोपीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी पावणेबारा वाजताच्या सुमारास २६ वर्षीय तरुणी कामावर निघाली होती. त्यावेळी ईकबालने तिचा पाठलाग केला व तिला थांबविले. तो तिच्याशी बोलण्यासाठी जबरदस्ती करू लागला. मात्र तिची त्याच्याशी बोलण्याची इच्छा नव्हती. तिने त्याला फटकारले असता ईकबालने भर रस्त्यावर तिचा विनयभंग केला. या प्रकाराने तरुणी हादरली व तिने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ईकबालविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे

Web Title: A young woman was stopped on the street and molested, the accused arrested