भरधाव कारने मजुराच्या साडेतीन वर्षीय चिमुकल्याला चिरडले

By योगेश पांडे | Updated: May 13, 2024 18:30 IST2024-05-13T18:29:13+5:302024-05-13T18:30:29+5:30

Nagpur : चिमुकल्याचे पालक त्याला घेऊन काही दिवसांअगोदरच मजुरीसाठी आले होते नागपुरात

A three-and-a-half-year-old child of a laborer was crushed by a speeding car | भरधाव कारने मजुराच्या साडेतीन वर्षीय चिमुकल्याला चिरडले

A three-and-a-half-year-old child of a laborer was crushed by a speeding car

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
संत्रा मार्केटजवळ एका भरधाव कारने साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याला चिरडले. चिमुकल्याचे पालक त्याला घेऊन काही दिवसांअगोदरच नागपुरात मजुरीसाठी आले होते व संत्रा मार्केटजवळील फुटपाथवर राहत होते. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

गच्छाली सजित मलाकार (२८, चंद्रपूर) असे तक्रारदाराचे नाव आहे. गच्छाली केळे विक्रीचे तसेच मजुरीचे काम करतो व चांदशाह दर्ग्याजवळ झोपडी बनवून कुटुंबियांसह राहतो. त्याचा नातेवाईक चंदू मलाकार हा पत्नी व दोन मुलांसह मजुरीसाठी पंधरा दिवसांअगोदर नागपुरात आला. तेदेखील गच्छालीसोबत रहायचे. शनिवारी आठ वाजताच्या सुमारास चंदूचा साडेतीन वर्षांचा मुलगा आदी हा इतर मुलांसोबत खेळत होता. खेळता-खेळता झोपडयातुन बाहेर चांदशाह दर्गासमोरील रोडवर आला. समोर एक मुलगा त्याला बोलवत असल्याने तो जात असताना कॉटन मार्केटकडून भरधाव वेगाने पांढऱ्या रंगाची कार आली व आदीला धडक देऊन निघून गेली. त्याच्या पालकांनी धाव घेतली असता आदीच्या डोके व कानातून रक्त येत होते. त्याला मेयो इस्पितळात नेले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गच्छालीच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

Web Title: A three-and-a-half-year-old child of a laborer was crushed by a speeding car