वाठोडातून बेपत्ता झालेल्या 'त्या' महिलेचा खून; एक संशयित ताब्यात

By दयानंद पाईकराव | Updated: March 25, 2023 17:17 IST2023-03-25T17:16:26+5:302023-03-25T17:17:02+5:30

तिच्या कुटुंबीयांनी वाटोळा पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली होती

A suspect booked for Murder of missing woman from Wathoda | वाठोडातून बेपत्ता झालेल्या 'त्या' महिलेचा खून; एक संशयित ताब्यात

वाठोडातून बेपत्ता झालेल्या 'त्या' महिलेचा खून; एक संशयित ताब्यात

नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत दिघोरी परिसरातून बेपत्ता झालेल्या महिलेचा हिंगणा परिसरात खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. याप्रकरणी आठवड्या पोलिसांनी एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.

सुषमा आनंदराव काळबांडे (४२, हनुमान मंदिराजवळ दिघोरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला २३ मार्च पासून बेपत्ता होती. याबाबत तिच्या कुटुंबीयांनी वाटोळा पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान आज शनिवारी संबंधित महिलेचा मृतदेह हिंगणा परिसरात आढळला. पाटोदा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी दीपक इंगळे (४०, साईबाबा नगर दिघोरी) या संशयावरून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वाठोडा पोलीस करीत आहेत.

Web Title: A suspect booked for Murder of missing woman from Wathoda