दुचाकीस्वाराकडून भर रस्त्यावर कोचिंगला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग

By योगेश पांडे | Updated: August 18, 2023 17:08 IST2023-08-18T17:07:43+5:302023-08-18T17:08:43+5:30

आज तुम्हारी, कल दुसरी की बारी होगी म्हणत धमकावले

A student going to coaching on Bhar road was molested by a biker | दुचाकीस्वाराकडून भर रस्त्यावर कोचिंगला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग

दुचाकीस्वाराकडून भर रस्त्यावर कोचिंगला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग

नागपूर : एका अज्ञात दुचाकीस्वाराकडून कोचिंग क्लासला चाललेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा भर रस्त्यावर विनयभंग करण्यात आला. विद्यार्थिनी घाबरून घरी निघाली असताना तिचा पाठलाग करून, ‘आज तुम्हारी बारी थी, कल दुसरी की बारी होगी’ अशी धमकीदेखील दिली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १६ वर्षीय विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीसह रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास कोचिंग क्लासला जात होती. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या ॲक्टीव्हावरून आलेल्या एका तरुणाने अल्पवयीन मुलीच्या शरीराला स्पर्श केला व तिचा विनयभंग केला. यामुळे दोन्ही मैत्रिणी हादरल्या. विनयभंग झालेली विद्यार्थिनी घाबरून घराकडे निघाली असता आरोपीने तिच्या मागे येऊन उद्या तुझ्या मैत्रिणीसोबतदेखील असाच प्रकार करेन, अशी धमकी दिली.

विद्यार्थिनीने घरी जाऊन पालकांना हा प्रकार सांगितला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पालकांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविला असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू आहे.

Web Title: A student going to coaching on Bhar road was molested by a biker