शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ ! २७ वर्षीय निवासी डॉक्टर महिलेसोबत विनयभंग; मेयोच्या विभागप्रमुखाविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 16:07 IST

तहसील पोलिसांची कारवाई : मार्डने दिला होता राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेयो रुग्णालयातील निवासी महिला डॉक्टरचा छळ करणाऱ्या न्यायवैद्यक विभागाचे विभागप्रमुख डॉ. मकरंद सूर्यकांत व्यवहारे यांच्याविरुद्ध तहसील पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, गुन्हा दाखल न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने दिला होता.

तहसील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २७ वर्षीय महिला निवासी डॉक्टर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) न्यायवैद्यकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षाला शिकत आहे. ती फेब्रुवारीपासून या विभागात कार्यरत आहे. न्यायवैद्यक विभागाचे विभागप्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे तिला सुरुवातीपासून त्रास देत होते. तिला एकटीला वारंवार आपल्या कक्षात बोलावून तिच्यासोबत आपत्तीजनक व्यवहार करीत होते. 

सुरुवातीला या महिला निवासी डॉक्टरने त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले; परंतु नंतर तिने या बाबींना विरोध केला असता तिला डॉ. व्यवहारे यांनी धमकी दिली. महिला डॉक्टरने याबाबत रुग्णालयातील वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर महिला निवासी डॉक्टरने तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे निवासी डॉक्टरांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत होता. निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने डॉ. व्यवहारेंवर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करून मुख्यमंत्री तसेच पोलिस आयुक्तांना निवेदन सादर करून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. अखेर शुक्रवारी तहसील पोलिसांनी डॉ. मकरंद व्यवहारेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. लवकरच डॉ. व्यवहारेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती तहसील पोलिसांनी दिली. मेडिकलमध्ये असताना निवासी डॉक्टरांच्या तक्रारीवरून डॉ. व्यवहारे विरुद्ध अजनी पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Chaos in medical field: Doctor harassed; case filed against department head.

Web Summary : A resident doctor was harassed by the head of the forensic department at Mayo Hospital, Nagpur. A molestation case has been filed, sparking outrage and threats of statewide protests by resident doctors.
टॅग्स :Medicalवैद्यकीयnagpurनागपूरcollegeमहाविद्यालय