छोटी चूक महागात पडू शकते; गॅस लिकेजच्या तक्रारी वाढल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 15:55 IST2026-02-20T15:53:39+5:302026-02-20T15:55:53+5:30

Nagpur : घरगुती गॅस वापरताना सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यावश्यक

A small mistake can be costly; Gas leakage complaints increase! | छोटी चूक महागात पडू शकते; गॅस लिकेजच्या तक्रारी वाढल्या!

A small mistake can be costly; Gas leakage complaints increase!

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
गॅस सिलिंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत अनेकांना दुखापती होणे, प्रसंगी काहींचा जीव जाणे अशा घटना समोर येत असतात. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घरगुती गॅस वापरताना सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यावश्यक असते. गॅस सिलिंडरबाबत होणारी थोडीशी बेपर्वाई मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देऊ शकते. नागपूर शहरात गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत अनेक नागरिक जखमी होण्याच्या, तर काही प्रसंगी जीव जाण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. गॅस सिलिंडर हाताळताना सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा अपघातांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घडणाऱ्या या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे.

गॅस लिकेजच्या तक्रारी!

जुना झालेला पाइप, खराब झालेले रेग्युलेटरचे वॉशर किंवा शेगडीच्या बर्नरमधील बिघाडामुळे गळती होते. गॅस एजन्सीकडून वेळोवेळी उपकरणांची तांत्रिक तपासणी करून घेतल्यास गळतीच्या सततच्या तक्रारींपासून सुटका मिळू शकते आणि अपघात टाळता येतात.

खबरदारीचे नियम काय !

नेहमी आयएसआय मार्क असलेलाच रबरी पाइप वापरावा आणि तो दर दोन वर्षांनी बदलावा. गॅसचा वापर झाल्यानंतर रेग्युलेटर बंद करणे, पाइपची नियमित तपासणी करणे आणि गळतीचा वास आल्यास तातडीने खिडक्या उघड्या करून वीज उपकरणे बंद करणे, यांसारख्या साध्या नियमांचे पालन केल्यास मोठ्या दुर्घटना टाळता येऊ शकतात.

गॅस सिलिंडर स्फोटाची कारणे ?

सिलिंडरचा स्फोट मुख्यत्वे गॅस गळती होऊन आजूबाजूला साचलेल्या गॅसचा आगीशी संपर्क आल्याने होतो. तसेच, गॅस शेगडीजवळ ज्वलनशील पदार्थ ठेवणे किंवा गळती असताना विजेचा स्विच बोर्ड वापरल्याने निर्माण होणाऱ्या ठिणगीमुळे भीषण स्फोट होऊ शकतो.

घरात गॅसचा सतत वास ?

जर घरात शिरल्याबरोबर गॅसचा विशिष्ट उग्र वास येत असेल, तर समजावे की सिलिंडर, रेग्युलेटर किंवा पाइपमधून गळती होत आहे. अशा वेळी घाबरून न जाता शांत राहून त्वरित सुरक्षा उपाय योजने गरजेचे आहे. कारण थोडासाही उशीर मोठ्या आगीचे कारण ठरू शकतो.

लिकेज आहे असे वाटल्यास...

गॅस लिकेज झाला असे १ वाटल्यास घराची खिडक्या, दारे त्वरित उघडावीत. लिकेज असल्यास वास येतो. सगळ्यात आधी रेग्युलेटर चेक करा. तो सुरू असेल तर लगेच बंद करा. गॅसच्या वासाची शंका आली तर काडीपेटी लावू नका. दिवा जळत असेल तर तो आधी बंद करावा. सिलिंडरचे बटन बंद करावे. गॅस कुठून लिकेज होतो ते तपासून घ्या, आपत्कालीन हेल्पलाइनवर संपर्क साधा.

Web Title : छोटी सी चूक पड़ सकती है भारी; गैस रिसाव की शिकायतें बढ़ीं!

Web Summary : गैस रिसाव से आग, चोटें और मौतें हो सकती हैं। गैस सिलेंडर का उपयोग करते समय सुरक्षा उपाय महत्वपूर्ण हैं। दोषपूर्ण उपकरण और लापरवाही मुख्य कारण हैं। दुर्घटनाओं को रोकने के लिए नियमित रखरखाव, आईएसआई-चिह्नित पाइपों का उपयोग और रिसाव का पता चलने पर तत्काल कार्रवाई महत्वपूर्ण है।

Web Title : Small Gas Leakage Mistakes Can Be Costly; Complaints are Rising!

Web Summary : Gas leaks can cause fires, injuries, and fatalities. Safety measures are vital when using gas cylinders. Faulty equipment and negligence are primary causes. Regular maintenance, using ISI-marked pipes, and immediate action upon detecting leaks are crucial to prevent accidents.

टॅग्स :nagpurनागपूर