शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

काटोलमध्ये महाविकास आघाडीत तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 18:11 IST

Nagpur : याज्ञवल्क्य जिचकार, प्रमोद घरडे, विलास झोडापे यांचे उमेदवारी अर्ज दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क काटोल/उमरेड : महायुती आणि महाविकास आघाडीचे नागपूर ग्रामीणच्या सहाही मतदारसंघातील पूर्ण उमेदवार निश्चित झालेले नाही. मात्र काटोल आणि उमरेड मतदारसंघात या दोन्ही आघाड्यात नाराजांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. काटोलमध्ये माजी मंत्री आ. अनिल देशमुख यांच्याविरोधात दंड थोपटत युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस याज्ञवल्क्य जिचकार यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. इकडे उमरेडमध्ये भाजपमधून इच्छुक असलेले प्रमोद घरडे आणि त्यांच्या पत्नी रूपाली घरडे या दाम्पत्याने उमेदवारी अर्ज दाखल करीत राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न केला.

दोघांनीही भाजपा आणि अपक्ष असे प्रत्येकी दोन अर्ज सादर केले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) विलास झोडापे यांनी सुद्धा अपक्ष अर्ज सादर केला. त्यामुळे उमरेडमध्ये महायुतीतही बंडखोरी होण्याचे संकेत आहे. काटोलमध्ये जिचकार यांनी समर्थकांसह कृषी उत्पन्न बाजार समिती येथून रॅली काढत तहसील कार्यालयात दाखल झाले. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष चिवंडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत त्यांच्या आई राजश्री श्रीकांत जिचकार, मैत्री जिचकार, सुरेंद्र जिचकार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpurनागपूर