आठ महिने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; व्हिडीओ ‘क्लिप’देखील काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2022 20:29 IST2022-09-23T20:25:49+5:302022-09-23T20:29:31+5:30

Nagpur News आठ महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला लकडगंज पोलिसांनी अटक केली आहे.

A minor girl was molested for eight months; The clip was also removed | आठ महिने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; व्हिडीओ ‘क्लिप’देखील काढली

आठ महिने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; व्हिडीओ ‘क्लिप’देखील काढली

ठळक मुद्देकळमन्यातील आरोपीला अटकलकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार

नागपूर : आठ महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला लकडगंज पोलिसांनी अटक केली आहे. अमन रहमान शेख (२१, कळमना) असे त्याचे नाव आहे. चार वर्षांपूर्वी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आठवीच्या वर्गात शिकत होती. त्यावेळी एका मित्राच्या माध्यमातून तिची अमनशी ओळख झाली होती. तेव्हापासून विद्यार्थिनीची अमनशी मैत्री होती.

जानेवारी महिन्यात अमनने विद्यार्थिनीला लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत मारवाडी चौकात असलेल्या हॉटेलमध्ये नेले. तेथे तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर कळमना येथील घरी नेऊन अत्याचार करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने व्हिडीओ क्लिपदेखील तयार केली.

गुरुवारी अमनने विद्यार्थिनीला दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी २०० रुपये मागितले. विद्यार्थिनीने कपाटात ठेवलेले तिच्या आईचे २०० रुपये चोरले. पैसे दिसत नसल्याने आईला संशय आला व मुलीच्या पुस्तकात पैसे सापडले. तिने मुलीची खरडपट्टी काढत विचारणा केली असता हा प्रकार समोर आला. तिच्या कुटुंबीयांनी लकडगंज पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अमनला अटक केली.

Web Title: A minor girl was molested for eight months; The clip was also removed