फेसबुक फ्रेंडकडून लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार

By योगेश पांडे | Updated: March 4, 2024 22:08 IST2024-03-04T21:25:30+5:302024-03-04T22:08:01+5:30

पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

A girl was molested by a Facebook friend | फेसबुक फ्रेंडकडून लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार

फेसबुक फ्रेंडकडून लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार

नागपूर: फेसबुक फ्रेंडने शहरातील एका तरुणीवर अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केला.

ऋषिकेश प्रभाकर कुथे (२६, सक्करदरा) असे आरोपीचे नाव आहे. २०२१ साली त्याची संबंधित तरुणीशी फेसबुकवर ओळखी झाली. त्याने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. त्यांच्यात अगोदर चॅटिंग सुरू झाले व त्यानंतर मोबाईलवर प्रत्यक्ष बोलायला लागले. ऋषिकेशने तिच्यावर प्रेमाचे जाळे फेकले व लग्नाचे आमीष दाखविले.

तो तिला नोव्हेंबर २०२१ मध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खोलीत घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने अनेकदा तिच्यावर अत्याचार केला. लग्नासाठी विचारणा केल्यावर तो टाळाटाळ करायचा. त्याच्या या वागण्यामुळे कंटाळलेल्या तरुणीने लग्न कधी करतो असे ठणकावून विचारले. यावरून ऋषिकेश संतापला व त्याने लग्नासाठी नकार दिला. त्याने तिला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. अखेर पीडितेने एमआयडीसी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

 

Web Title: A girl was molested by a Facebook friend